TRENDING:

Shani Astrology 2026: खूप त्रासात काढले दिवस; एप्रिलमध्ये उगवता शनिदेव पावणार! 5 राशींचं नशीब फळफळणार

Last Updated:
Shani Astrology: काही राशींच्या आयुष्यातील सध्या सुरू असलेला खूप अडचणींचा काळ लवकरच संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार संत गतीने मार्गक्रमण करणारा शनी ग्रह लवकरच उदय पावणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनीच्या थोड्याफार हालचालीलाही विशेष महत्त्व आहे. या वर्षात शनीचे राशी परिवर्तन होणार नसले तरी त्याच्या स्थितीमध्ये ठराविक काळाने बदल होत राहतो, त्याचा संपूर्ण राशीचक्रावर चांगला वाईट परिणाम दिसून येतो. ज्योतिष शास्त्रीय गणनेनुसार 17 एप्रिल 2026 रोजी असताना गेलेला शनि मीन राशीतच उदय पावणारा आहे. उगवणारा शनि काही राशींना लकी ठरणार आहे. त्या राशीन विषयी जाणून घेऊया.
advertisement
1/6
खूप त्रासात काढले दिवस; एप्रिलमध्ये उगवता शनिदेव पावणार! 5 राशींचं नशीब फळफळणार
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह उगवणाऱ्या अवस्थेत आल्यावर शक्तिशाली होतो. शनिदेवाचा उदय काही लोकांसाठी वरदान ठरेल, जे काही काळापासून मानसिक किंवा आर्थिक तणावाचा अनुभव घेत आहेत. 17 एप्रिल 2026 रोजी शनिदेवाच्या उदयामुळे कोणाला लाभ मिळेल जाणून घेऊ.
advertisement
2/6
कुंभ - साडेसाती भोगत असलेल्या या राशीची माणसं आता थकून गेली आहेत. अजून किती दिवस हा त्रास असं त्यांना वाटणं साहजिक आहे. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, त्यामुळे चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. त्यातच आता होणारा शनीचा उदय तुम्हाला दिलासा देईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. लोकांवर तुमचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे अडखळणारी कामेही पार पडतील. दीर्घकालीन आजारांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
वृषभ - अपेक्षा लागून राहिली आहे, कष्ट करून फळाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या खुशखबर येण्यासारखी ग्रहस्थिती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी शनिचा उदय वरदान ठरेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती शक्य होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
मकर - अलिकडेच साडेसाती संपलेली मकर रास शनिच्या या बदलाने आणखी खुलेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मकर ही शनीची राशी असल्याने, त्याचा उदय तुमचा आत्मविश्वास वाढवेल. गेल्या अडीच वर्षांपासून तुम्ही करत असलेल्या मेहनतीला आता फळ मिळू लागेल. तुम्ही असे कठीण निर्णय घेऊ शकाल जे भविष्यात फायदेशीर ठरतील. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील.
advertisement
5/6
मिथुन - ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीसाठी, शनि दहाव्या घरात म्हणजेच कर्माच्या घरात, उदय पावेल. व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन संधी निर्माण होतील. परदेशी संपर्क फायदेशीर ठरतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
6/6
धनु - ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या मागील त्रास आता कमी होतील, शनिच्या उदयामुळे सुखसोयी आणि ऐश्वर्यात वाढ होईल. या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. घरी छान आनंदाचे वातावरण असण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला अधिक उत्साही वाटेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Astrology 2026: खूप त्रासात काढले दिवस; एप्रिलमध्ये उगवता शनिदेव पावणार! 5 राशींचं नशीब फळफळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल