सुकामेवा नाही, जेवणच देतं पोषक तत्त्व; डोंगराळ भागात थंडीत 'असं' होतं संरक्षण
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपला भारत विविधतेने नटलेला आहे. इथं जेवणापासून राहणीमानापर्यंत सर्वत्र विविधता आढळते. भारताच्या डोंगराळ भागात उगणाऱ्या धान्यापासून अतिशय स्वादिष्ट असे पदार्थ बनवले जातात. त्यापैकी काही खास पदार्थ आपण पाहणार आहोत.
advertisement
1/5

काळे बिन्स पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. यापासून सूप, सलाड, स्मूदी, वरण असे विविध पदार्थ बनवले जातात. विशेषतः काळ्या बिन्सचं वरण शिजवून त्याचं पिठात मिश्रण करून ते उकडवून खाल्लं जातं.
advertisement
2/5
डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आहारात काळ्या बिन्सच्या वरणाचा प्रामुख्याने समावेश असतो. या वरणामुळे जीवनसत्त्व, पौष्टिक तत्त्व मिळतातच, शिवाय शरीर ऊर्जावान राहतं.
advertisement
3/5
कुळीथाच्या डाळीत अँटीऑक्सिडंट तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. या डाळीमुळे शरीर पूर्ण स्वच्छ होतं. अगदी किडनी स्टोनचा त्रास बरा होण्यासही मदत मिळते. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी डोंगराळ भागातील लोक आहारात या डाळीचा समावेश करतात.
advertisement
4/5
भांग प्यायल्यास नशा येते असं म्हणतात. परंतु याच भांगेची शेती केली जाते आणि तिचं योग्य पद्धतीने सेवन केल्यास शरिराला अनेक फायदे होतात, असंही म्हटलं जातं. भांगेच्या बिया केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. शिवाय यामुळे तणाव कमी होतो आणि झोपही चांगली लागते. डोंगराळ भागात भांगेच्या बियांची चटणी बनवून खाल्ली जाते. शिवाय या बियांच्या रसाचा विविध भाज्यांमध्ये आणि वरणात समावेश केला जातो.
advertisement
5/5
डोंगराळ भागातील लोक उत्सवांदरम्यान सेल नावाचा पदार्थ बनवतात. तांदूळ वाटून त्याचे गोळे कढईत तळून गोड सेल बनवून आवडीने खाल्ले जातात. म्हणजेच इथल्या लोकांच्या आहारात डाळींसह तांदळाचाही विशेष समावेश असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सुकामेवा नाही, जेवणच देतं पोषक तत्त्व; डोंगराळ भागात थंडीत 'असं' होतं संरक्षण