TRENDING:

आंबट-गोड बोरं जितकी स्वादिष्ट तितकीच पोषक तत्त्वांनी परिपूर्ण!

Last Updated:
आंबट गोड बोरं खायला कोणाला नाही आवडत. बोरांची वनस्पती काट्याने भरलेली असली तरी आपण त्यावरून उत्सुकतेने बोरं काढून अगदी चवीने खातो. पण बोरं जेवढी स्वादिष्ट लागतात तेवढीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर असतात, हे तुम्हाला माहितीये का?
advertisement
1/5
आंबट-गोड बोरं जितकी स्वादिष्ट तितकीच पोषक तत्त्वांनी परिपूर्ण!
बाजारात विविध प्रकारची बोरं मिळतात. हिवाळ्यात तर खूपच. बोरं आपल्यासाठी आणि त्यांच्या वनस्पतींची पानं गुरांसाठी गुणकारी असतात.
advertisement
2/5
बोरं नैसर्गिकरित्या उगतात, त्यामुळे त्यांचं उत्पादन मिळवण्यासाठी काही विशेष मेहनत करावी लागत नाही. वनस्पतीला एकदा बोरं आली की हाताने तोडून ती बाजारात विकली जातात.
advertisement
3/5
आयुर्वेदिक डॉक्टर अमित गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरं गरम असतात, त्यामुळे ती थंडीत खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. शिवाय शरिराला उब मिळाल्याने सर्दी, खोकला होत नाही.
advertisement
4/5
बोरांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे डोकेदुखीवर आराम मिळतो आणि झोपही चांगली लागते.
advertisement
5/5
बोरांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं, तर फायबर, जीवनसत्त्व आणि खनिजांनी बोरं परिपूर्ण असतात. भरपूर फायबर आणि कमी कॅलरीजमुळेच बोरं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
आंबट-गोड बोरं जितकी स्वादिष्ट तितकीच पोषक तत्त्वांनी परिपूर्ण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल