TRENDING:

Watermelon Or Muskmelon : कलिंगड की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ डायबेटिजच्या रुग्णांसाठी फायदेशीर

Last Updated:
उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेकजण स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड आणि खरबूज सारख्या फळांचे सेवन करतात. परंतु डायबेटिजच्या रुग्णांना फळांचे सेवन करताना देखील यामुळे शुगर वाढणार नाही ना याचा विचार करावा लागतो. तेव्हा कलिंगड आणि खरबूज खाण उन्हाळ्यात किती फायदेशीर ठरू शकत याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/6
कलिंगड की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ डायबेटिजच्या रुग्णांसाठी फायदेशीर
कलिंगड आणि खरबूज हे दोन्ही शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कलिंगडच्या सेवनाने शरीराला हायड्रेट राहतेच सोबतच वजन देखील कंट्रोलमध्ये येते.
advertisement
2/6
खरबूज आणि कलिंगड या दोन्ही फळातील ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो. ग्लायसेमिक इंडेक्स हे एक मापक आहे ज्यावरून समजते की कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील शुगर लेव्हल किती वेगात वाढते.
advertisement
3/6
कलिंगडमधील ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो, परंतु एकदा याचे सेवन केल्याने शरीरात कमी कार्बोहायड्रेट पोहोचते. तर एक कप खरबूजाचे ग्लायसेमिक लोड 3.14 पेक्षा थोडे कमी असते. याच कारण असं की दोन्ही फळांमध्ये 90 टक्के पाणी असतं.
advertisement
4/6
खरबूज आणि कलिंगड ही दोन्ही फळ डायबेटिज कंट्रोल करण्यासाठी उपयुक्त ठरतात. परंतु डायबेटिजच्या रुग्णांनी याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे. खरबूजमध्ये पोटॅशियम मात्रा जास्त असते तर सोडियमचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळते.
advertisement
5/6
खरबूजात कॅलरी, फायबर, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि फोलेट हे पोषक घटक असतात. याशिवाय खरबूजात अँटी-ऑक्सिडंट आणि एडेनोसिनसारखे अनेक औषधी गुणधर्मही आढळतात.
advertisement
6/6
कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि अँटी ऑक्सिडेंट्स सारखे अनेक पोषक घटक असतात. .
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Watermelon Or Muskmelon : कलिंगड की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ डायबेटिजच्या रुग्णांसाठी फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल