White Spots On Nails : नखांवर पांढरे डाग दिसतात, ते नेमकं काय असतं? याचे काही गंभीर दुष्परिणाम तर नाही?
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Does White Spots On Nails Harmful : आपल्या शरीरात होणारे बदल आपण नेहमी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. कारण त्याने आपलॆ आरोग्य स्थिती कळत असते. आज आम्ही तुम्हाला शरीरातील अशाच एका बदलाबद्दल सांगत आहोत. चला पाहूया.
advertisement
1/7

बऱ्याचदा आपल्या नखांमध्ये आपल्याला काही बदल दिसतात. त्याचा आरोग्यासाठी संबंध असतो. नखांवर पांढरे डाग दिसणे, हे आपल्या शरीराबद्दल काय सांगते. याची आज आपण माहिती घेणार आहोत.
advertisement
2/7
नखांवर दिसणारे लहान पांढरे डाग बऱ्याचदा लोकांना कॅल्शियमची कमतरता वाटतात. काही लोकांना हे गंभीर आजाराचे लक्षण वाटते. मात्र नखांवर असलेल्या या पांढऱ्या डागांमागे अनेक कारणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करणं आपण टाळलं पाहिजे.
advertisement
3/7
डॉ. राजकुमार (आयुष) यांनी यांच्यामते, नखांवर असलेल्या पांढऱ्या डागांना वैद्यकीय भाषेत 'ल्युकोनिचिया' म्हणतात. याचा आपल्याला शरीराला तास काही त्रास होत नाही. हे डाग बऱ्याच आपोआपच जातात. जशी नखं वाढतात तसे हे डाग वरच्या दिशेला सरकत अखेर कापले जातात. म्हणून ते गंभीर आजाराचे लक्षण असू शकत नाहीत.
advertisement
4/7
नखांवर पांढरे डाग पाडण्याचे कारण म्हणजे नखांना झालेली किरकोळ दुखापत. बऱ्याचदा आपल्याला नकळत लागलेला मार पुढे जाऊन पुढे जाऊन हा डाग बनतो. ही समस्या त्या लोकांमध्ये जास्त दिसते, जे वेगाने काम करतात किंवा नखं वारंवार कापतात.
advertisement
5/7
परंतु काहीवेळा आवश्यक पोषक तत्वांच्या अभावानेदेखील हे डाग पडू शकतात. झिंक, प्रथिने किंवा काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे नखांवर असा परिणाम होऊ शकतो. याचा सर्वांना त्रास होत नाही मात्र वारंवार असे होत असेल तर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
advertisement
6/7
हे डाग बऱ्याचदा नेलपॉलिश, नेलपेंट रिमूव्हर किंवा रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर केल्यानेही होऊ शकतात. या उत्पादनांमधील काही घटक नखांचा बाह्य थर कमकुवत करतात. यामुळे पांढरे डाग किंवा हलक्या रेषा येऊ शकतात. म्हणून शक्यतो यांचा वापर कमी करा.
advertisement
7/7
काहीवेळा अ‍ॅलर्जी किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे देखील नखांवर पांढरे डाग दिसू शकतात. या डागांसोबत तुम्हाला इतर कलाही लक्षणं दिसत असतील. जसे की, नखं जाड होणे, तुटणे किंवा रंग बदलत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
White Spots On Nails : नखांवर पांढरे डाग दिसतात, ते नेमकं काय असतं? याचे काही गंभीर दुष्परिणाम तर नाही?