TRENDING:

General Knowledge : TTE आणि TC यामध्ये काय फरक असतो? दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना देखील माहित नसेल

Last Updated:
भारतीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड घेतला जातो. या कामासाठी रेल्वेने टीटीई आणि टीसी यांना नियुक्त केले आहे. टीटीई आणि टीसी हे कर्मचारी एकच काम करत असेल तरी त्यांच्या अधिकारांमध्ये फरक आहे. दररोज रेल्वेने प्रवास करणारी अनेक लोक देखील टीटीई आणि टीसी यांमध्ये काय फरक असतो हे सांगू शकत नाहीत तेव्हा याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5
TTE आणि TC मध्ये काय फरक असतो? रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना देखील माहित नसेल
टीटीई म्हणजे ट्रॅवल टिकीट एग्जामिनर. रेल्वेचा असा कर्मचारी असतो जो प्रीमियम ट्रेनपासून ते मेल एक्प्रेस पर्यंत सर्व ट्रेन्समध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासतो. टीटीईचे काम हे प्रवासादरम्यान यात्रेकरूंची ओळख तपासून त्यांचे आयडी आणि सीटशी संदर्भात माहिती चेक करणे असे असते.
advertisement
2/5
टीटीई नेहमी काळ्या रंगाचे कोट परिधान करतात आणि त्यांच्या कोटवर टीटीई असे लिहिलेले असते. टीटीईची सर्व कामे ही ट्रेनच्या आतमध्ये होतात. (फोटो सौजन्य - इंटरनेट)
advertisement
3/5
टीटीई प्रमाणे टीसीचे काम देखील तिकीट चेक करणचं असतं, परंतु त्यांना असलेल्या अधिकारांमध्ये फरक असतो. जिथे टीटीई हा ट्रेनच्या आतमध्ये तिकीट चेक करतो तिथे टीसी हे ट्रेनच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचे तिकीट चेक करू शकतात. टीसी म्हणजेच टिकट कलेक्टर हे अधिकतर <a href="https://news18marathi.com/viral/tte-cannot-check-your-ticket-at-this-time-of-journey-know-the-indian-railway-rules-in-marathi-gh-mhpp-1177422.html">रेल्वे</a> प्लॅटफॉर्मवर तिकीट चेक करताना दिसतात.
advertisement
4/5
रेल्वेच्या नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तिकीट चेक करण्यासाठी टीटीई तुम्हाला उठवू शकत नाही; पण ज्यांचा प्रवास रात्री 10 वाजता सुरू होतो, त्यांना हा नियम लागू नाही, त्यांचं तिकीट टीटीई चेक करू शकतात.
advertisement
5/5
रेल्वेच्या एका नियमानुसार, तुमच्याकडे तिकीट काढण्यास वेळ नसल्यास तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता. प्रवासात टीटीईकडून बोर्डिंग स्टेशनपासून जिथे जायचं आहे तिथपर्यंतचं तिकीट घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
General Knowledge : TTE आणि TC यामध्ये काय फरक असतो? दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना देखील माहित नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल