Vegan Milk: व्हेगन मिल्क म्हणजे काय? कशापासून आणि कसं बनवू शकता?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे डॉक्टरही आहारामध्ये त्याचा समावेश करण्यास सांगतात. मात्र दूधाचेही प्रकार असतात हे तुम्हाला माहितीय का?
advertisement
1/8

दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे डॉक्टरही आहारामध्ये त्याचा समावेश करण्यास सांगतात. मात्र दूधाचेही प्रकार असतात हे तुम्हाला माहितीय का?
advertisement
2/8
प्राण्यांपासून मिळणारे दूध, अंडी आणि मांस मिळते. मात्र काहींना याची एलर्जी असते. मग ते लोक 'व्हेज मिल्क' म्हणजेच व्हेगन मिल्क घेतात. व्हेगन मिल्क काय असतं? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
advertisement
3/8
व्हेगन मिल्क हे शुद्ध शाकाहारी दूध असतं. हे कुठल्याही प्राण्यापासून मिळत नाही. ते झाडांच्या आणि वनस्पतींपासून बनवलं जातं. व्हेगन मिल्कमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतं. या दूधाने पोटाचे आजार कमी होतात.
advertisement
4/8
सोया दूध हे सर्वात जास्त वापरलं जाणारं दूध आहे. हे दूध बनवण्यासाठी सोयाबीन 6-8 तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर, साल काढून हाय स्पीड ब्लेंडरमध्ये बारीक करा. नंतर त्यात थोडे पाणी टाका आणि उकळी आली की थंड करा. यानंतर तुमचे दूध तयार होईल. चीज, दही, चहा, कॉफी, शेक यासह काहीही बनवू शकता.
advertisement
5/8
व्हेगन मिल्कमध्ये ओट्स मिल्कही येतं. ओट मिल्क बनवण्यासाठी काही काजूचे तुकडे आणि 3 चमचे ओट्स मिक्स करून 6 तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर, त्यांना बाहेर काढा आणि 200 मिली पाण्यात मिसळा, चांगले बारीक करा आणि नंतर गाळून घ्या. हे दूध 3 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून तुम्ही चहा आणि दूध बनवू शकता.
advertisement
6/8
नारळाचं दूधही आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. हे दूध बनवण्यासाठी ताज्या नारळाला थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या आणि नंतर गाळून घ्या. या नारळाच्या दुधापासून बनवलेल्या मिठाई खूप चवदार असतात.
advertisement
7/8
शेंगदाण्यापासून शाकाहारी दूध बनवता येतं. यासाठी शेंगदाणे 5-6 तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर ते सोलून पाण्याने चांगले ग्राउंड करावे. यानंतर दूध गाळून तयार होते. शेंगदाणा दुधाला एक विशिष्ट वास असतो, म्हणून हे घट्ट दूध फक्त दही बनवण्यासाठी वापरावं.
advertisement
8/8
बदामाच्या दुधाचे सेवन केल्याने शरीराला घोड्यासारखी ताकद तर मिळतेच, शिवाय स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. हे दूध अगदी कमी खर्चात घरी तयार करता येते. यासाठी बदाम आणि काजू 6 तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यांना पाण्यातून काढून ताजे पाण्याने बारीक करून गाळून घ्या.