AC Vs Cooler : उन्हाळ्यात एसी वापरणं चांगलं की कुलर? वीज बिलंच नाही आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Ac or cooler which is good :उन्हाळा सुरु झाला की फॅनसोबतच घरातल्या इतर इलेक्ट्रिक वस्तूंचाही वापर वाढतो. एसी, कुलर हे दोन्ही वापरात येतात. पण एसी आणि कुलर या दोन्हींपैकी आपल्या आरोग्यासाठी नेमकं कोणतं चांगलं आहे? तज्ज्ञांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर..
advertisement
1/9

एसी वापरावा की कुलर, याचा निर्णय आपण वीज बिलावरून घेऊ शकतो. म्हणजेच एसीचे बिल कुलरपेक्षा थोडं जास्तच येतं. पण एसी आणि कुलर यांचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? कशाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे.
advertisement
2/9
एसीमुळे आपल्याला कमी वेळेत थंडावा मिळतो, तर कूलर कमी खर्चात थंडावा देतो. मात्र यांचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. लोकल 18 शी बोलताना सतना येथील जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अखिलेश खार यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
advertisement
3/9
डॉक्टर अखिलेश यांच्यामते, ऑफिस, घर किंवा क्लासरूम अशा एसीच्या वातावरणात सतत वावरणाऱ्या लोकांचं शरीर एसीच्या तापमानाशी सहज जुळवून घेतं. मात्र जे लोक बाहेरच्या उन्हातून थेट एसीमध्ये जातात किंवा सतत आत-बाहेर करतात, त्यांच्या शरीराचं तापमान बिघडू शकतं.
advertisement
4/9
शरीराचं तापमान सतत बदलत राहिल्यास शरीरातील श्लेष्मपटल आणि इतर संवेदनशील अवयवांवर परिणाम होतो. यामुळं व्हायरल आणि बॅक्टेरीयल इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत नाक, कान आणि घशाच्या समस्या अधिक आढळतात.
advertisement
5/9
जिथे खूप उष्णता आहे अशा शहरांमध्ये मध्ये किंवा बंद ठिकाणी एसी जास्त फायदेशीर आहे. कारण तो लवकर वातावरण थंड करतो. पण एसीमध्ये जास्त कला राहिल्याने अनेक त्रासही होऊ शकतात. यामुळे त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी आणि घशात खवखव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
6/9
कूलरचा वापर तास बऱ्यापैकी सुरक्षित आहे, कुलर हवेतील आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिकरित्या वातावरण थंड करते. कुलरमुळे वातावरण झटक्यात बदलत नाही, त्यामुळे शरीराला अचानक होणारे तापमान बदलाचे झटके झेलावे लागत नाहीत. तसेच कुळातील बिलही एसीच्या तुलनेत कमी येते.
advertisement
7/9
तज्ज्ञ सांगतात की, उन्हाळ्यात खूप थंड पाणी पिणे, एसीमधून बाहेर पडून थेट उन्हात जाणे किंवा उन्हातून थेट एसीमध्ये जाणे. यामुळे तापमान वारंवार बदलते आणि याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे सर्दी, फ्लू, ताप आणि ॲलर्जी यांसारख्या समस्या वाढू शकतात.
advertisement
8/9
डॉक्टरांच्या मते, तुम्हाला एकाची निवड करायची असेल तर कूलर हा अधिक पर्यावरणपूरक पर्याय आहे. एसीमुळे होणारे आरोग्याचे नुकसान, वीज बिलाचा खर्च सर्वच कुलरच्या तुलनेत जास्त आहे. तरीही तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. फक्त योग्य ती खबरदारी नक्की घ्या.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
AC Vs Cooler : उन्हाळ्यात एसी वापरणं चांगलं की कुलर? वीज बिलंच नाही आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम!