प्रवाशांनो टेन्शन सोडा, रेल वन ॲपवरील अडकलेले पैसे आता परत मिळणार; फक्त 'हे' करा
Last Updated:
Railway Ticket APP : रेल वन अॅपवर तिकीट काढताना पैसे वजा होऊनही तिकीट न मिळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने एक मोहीम सुरू केली आहे.
advertisement
1/7

रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून युटीएस अॅप बंद होऊन त्याजागी रेलवन हे अॅप वापरात आलेले आहे.
advertisement
2/7
काही दिवसांपासून रेल्वेच तिकीट काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेल वन अॅपवरुन व्यवहार करताना अनेकदा प्रवशांच्या खात्यातून पैसे वजा होत आहेत मात्र तिकीट मिळत नाही अशा तक्रारी येत आहेत
advertisement
3/7
एवढंच नाही तर तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड मिळण्यासही वेळ लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ''सरल परतावा'' सेवा हे अभियान सुरु करत या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे.
advertisement
4/7
या अभियानाद्वारे प्रवासी आणि संबंधित न बँका यांच्यात थेट समन्वय साधून संपूर्ण रिफंड देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
advertisement
5/7
प्रवाशांना रिफंडबाबत अडचणी आल्याल रेल वन अॅप किंवा अधिकृत माध्यमांद्वारे तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदवताना आवश्यक अचूक माहिती भरणे, बँक स्टेटमेंट आणि ई-मेल नियमित तपासणे गरजेच असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
advertisement
6/7
अडथळा दूर करताना प्रवाशांना एक क्युआर कोड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तिकीट खिडकी यावर हा कोड उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी हा कोड स्कॅन केल्यावर त्यांना थेट तक्रार नोंदवता येईल शिवाय तक्रारीची सद्यस्थिती काय आहे याचीही माहिती पाहता येईल.
advertisement
7/7
ग्राहकांनी तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणांची तपासणी करुन बँका आणि पेमेंट गेट वे यांच्याशी समन्वय साधत तक्रारी दूर करण्यात येतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
प्रवाशांनो टेन्शन सोडा, रेल वन ॲपवरील अडकलेले पैसे आता परत मिळणार; फक्त 'हे' करा