TRENDING:

Rohit Sharma : रोहितला जिंकवून दिली पहिली IPL ट्रॉफी, मुंबईचे ते 11 खेळाडू सध्या काय करतात?

Last Updated:
आयपीएल 2026 चा मोसम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयपीएलचा पहिला सामना 28 मार्च रोजी गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होईल.
advertisement
1/13
रोहितला जिंकवून दिली पहिली IPL ट्रॉफी, मुंबईचे ते 11 खेळाडू सध्या काय करतात?
आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात 29 मार्चला मुंबई आणि केकेआर यांच्यात लढत होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा हायव्होल्टेज सामना रंगेल. मुंबई ही आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी टीम आहे.
advertisement
2/13
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबई आयपीएल चॅम्पियन बनली. या सर्व मोसमांमध्ये रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार होता, पण मागच्या 5 वर्षांमध्ये मुंबईला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
advertisement
3/13
मुंबईने 2013 साली पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली तेव्हाचा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू अजून आयपीएलमध्ये खेळत आहे. फायनलमध्ये खेळलेले इतर 10 खेळाडू निवृत्त होऊन वेगळी भूमिका बजावत आहेत.
advertisement
4/13
वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर ड्वॅन स्मिथ हा 2017 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. तसंच आता तो वेगवेगळ्या टीमचा मेंटर आणि कोच म्हणून भूमिका पार पाडत आहे.
advertisement
5/13
विकेट कीपर आदित्य तरे हा अजूनही देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. 2021-22 पर्यंत आदित्य तरे मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळायचा, पण 2022-23 च्या रणजी मोसमात आदित्य उत्तराखंडकडून खेळायला लागला.
advertisement
6/13
दिनेश कार्तिक हादेखील 2013 च्या आयपीएल फायनलमध्ये मुंबईकडून खेळला. दिनेश कार्तिक हा सध्या आरसीबीचा प्रशिक्षक आहे, तसंच तो आता कॉमेंट्रीही करतो.
advertisement
7/13
अंबाती रायुडू हा 2023 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, त्यानंतर आता तो कोचिंग, मेंटरिंग आणि राजकीय क्षेत्रात आहे. आंध्र प्रदेशमधील जन सेना पक्षामध्ये अंबाती रायुडू सक्रीय आहे.
advertisement
8/13
कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सकडून जगभरातल्या वेगवेगळ्या लीगमध्ये खेळतो, तर आयपीएलमध्ये पोलार्ड मुंबईच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे.
advertisement
9/13
भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग हा हिंदी कॉमेंट्री करताना दिसतो, तसंच तो आप पक्षाकडून राज्यसभेचा खासदारही आहे.
advertisement
10/13
हिमाचल प्रदेशचा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर रिशी धवन हा 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल फायनल खेळला. रिशी धवनने जानेवारी 2025 मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती.
advertisement
11/13
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल जॉनसन 2015 साली आंतरराष्ट्रीय आणि 2018 साली सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. फॉक्स स्पोर्ट्ससाठी जॉनसन कॉमेंट्री करतो.
advertisement
12/13
मुंबई इंडियन्सचा सगळ्यात यशस्वी फास्ट बॉलर लसिथ मलिंगा हादेखील क्रिकेटमधून निवृत्त झाला. मलिंगा हा आता मुंबई इंडियन्सचा बॉलिंग प्रशिक्षक आहे.
advertisement
13/13
प्रग्यान ओझानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यानंतर तो कॉमेंट्री क्षेत्रात वळला. प्रग्यान ओझा हा आता टीम इंडियाच्या निवड समितीचा सदस्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहितला जिंकवून दिली पहिली IPL ट्रॉफी, मुंबईचे ते 11 खेळाडू सध्या काय करतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल