IPL 2026 : ईशान किशन-अभिषेक शर्मा नव्या भूमिकेत, हार्टब्रेक होताच काव्या मारनने दिली मोठी जबाबदारी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारणला मोठा झटका बसला आहे. कारण आयपीएल सूरू होण्याआधीच एका स्टार खेळाडूने तिची साथ सोडली आहे.
advertisement
1/7

आयपीएल 2026 च्या हंगामाला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिलाच सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे.
advertisement
2/7
दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असताना सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारणला मोठा झटका बसला आहे. कारण आयपीएल सूरू होण्याआधीच एका स्टार खेळाडूने तिची साथ सोडली आहे.
advertisement
3/7
खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून या गोष्टीची चर्चा होती. स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.पण त्याच्या उपलब्धतेबाबत ठोस माहिती मिळत नव्हती. पण आता ठोस माहिती मिळाल्यामुळे काव्या मारनला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
4/7
सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याच्या पाठीला दुखापत झाली होती.या दुखापतीतुन तो अद्याप सावरलेला नाही आहे.त्यामुळे तो आयपीएल 2026 च्या सुरूवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
दरम्यान तो सुरुवातीच्या किती सामन्यांना मुकेल आणि कधीपर्यंत मैदानात उतरेल याची अद्याप त्याने माहिती दिलेले नाही आहे.त्यामुळे पॅट कमिन्स जिथपर्यंत बरा होत नाही, तिथपर्यंत सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका आहे.
advertisement
6/7
या घटनेनंतर आता पॅट कमिन्स बरा होत नाही तिथपर्यंत सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी ही ईशान किशनच्या खांद्यावर देण्यात आली आहे.त्याच्यासोबत अभिषेक शर्माला संघाचा उप कर्णधार बनवण्यात आले आहे.
advertisement
7/7
दरम्यान पॅट कमिन्सच्या या अनुपस्थितीत ईशान किशनच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादचा संघ कशी कामगिरी करतो? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : ईशान किशन-अभिषेक शर्मा नव्या भूमिकेत, हार्टब्रेक होताच काव्या मारनने दिली मोठी जबाबदारी