Raqesh Bapat Divorce : अजूनही दोघांचं चांगलं बाँडिंग, मग का मोडला RB आणि रिद्धीचा 8 वर्षांचा संसार? अखेर बहिणीने केला खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Raqesh Bapat Divorce Reason :अभिनेता राकेश बापटचा आठ वर्षांच्या संसारानंतर डिवोर्स झाला. त्याच्या डिवोर्सचं कारण काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. त्याच्या बहिणीनं यामागचं कारण सांगितलं.
advertisement
1/9

अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. घरात आल्यानंतर स्पर्धकांची पर्सनल लाइफ देखील सगळ्यांसमोर येते. राकेश बापटने देखील त्याच्या लग्नाबाबत आणि डिवोर्सबाबत अनेकदा मोकळेपणानं भाष्य केलं आहे.
advertisement
2/9
राकेश बापटचं लग्न अभिनेत्री रिद्धी डोगराबरोबर झालं होतं. आठ वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी डिवोर्स घेतला. पण डिवोर्सनंतरही ते एकमेकांचे क्लोज फ्रेंड्स आहेत.
advertisement
3/9
आरबीने बिग बॉसच्या घरात असं सांगितलं की, त्यांनी त्यांचं लग्न वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. डिवोर्सनंतर दोघेही मुव्ह ऑन होऊ शकलेले नाहीत असंही त्याने सांगितलं.
advertisement
4/9
राकेश आणि रिद्धी त्यांच्या डिवोर्सचा निर्णय खूप मॅज्युअर्डली घेतल्याचंही त्याने सांगितलं. पण त्यांच्या डिवोर्समागचं खरं कारण काय होतं असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. राकेशच्या बहिणीनं याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं.
advertisement
5/9
राकेशची बहिण शीलत हिनं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राकेशच्या डिवोर्सवर भाष्य केलं. ती म्हणाली, "ते दोघे एकमेकांचा खूप रिस्पेक्ट करतात. पण कधी कधी अपेक्षा वाढतात तेव्हा ते नातं डाऊनवर्ड जायला लागतं. त्यामुळे त्यांनी त्याच्या मधला मार्ग निवडला."
advertisement
6/9
"त्यांची चांगली फ्रेंडशिप आहे, रिस्पेक्ट चांगला आहे. लग्नात जमत नसेल तर त्यात टॉक्सिक न होता... त्यांचं नातं खूप हेल्द आहे."
advertisement
7/9
"त्याला टॉक्सिसिटी आवडत नाही. तो कोणाला हेट करू शकत नाही. ना ती करू शकते. त्या दोघांची फ्रेंडशिप खूप छान आहे. ते दोघे बेस्टेस फ्रेंड आहेत. ते एकमेकांचे बडीज आहेत", असंही तिनं सांगितलं.
advertisement
8/9
राकेश मराठी बिग बॉसमध्ये असताना रिद्धी The 50 या शोमध्ये होती. तो शो संपवून ती बाहेर आली तेव्हा तिला राकेश बिग बॉसमध्ये असल्याचं कळलं. तिने राकेशसाठी खास व्हिडीओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या.
advertisement
9/9
हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला होता. डिवोर्सनंतरही त्यांचं हेल्दी रिलेशनपासून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. राकेशने बिग बॉसमध्ये दोघांविषयी जे जे सांगितलं ते सगळं खरं असल्याचा प्रत्यय आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Raqesh Bapat Divorce : अजूनही दोघांचं चांगलं बाँडिंग, मग का मोडला RB आणि रिद्धीचा 8 वर्षांचा संसार? अखेर बहिणीने केला खुलासा