TRENDING:

Mumbai Indians : वर्ल्ड कप जिंकवूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नाही... सूर्याला मुंबई इंडियन्समध्ये वेगळाच रोल!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना 29 मार्चला खेळेल.
advertisement
1/8
वर्ल्ड कप जिंकवूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नाही... सूर्याला मुंबई इंडियन्समध्ये वेगळाच रोल!
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्याआधी मुंबईचा कोच महेला जयवर्धनेने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
2/8
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली, पण 2020 नंतर मुंबईला एकदाही चॅम्पियन होता आलेलं नाही. या मोसमाआधी मात्र मुंबईची टीम कागदावर मजबूत वाटत आहे.
advertisement
3/8
भारताला नुकताच टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारे सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे चारही खेळाडू मुंबई इंडियन्सकडे आहेत. याशिवाय रोहित शर्माही पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
4/8
सूर्यकुमार यादव हा भारताच्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कर्णधार आहे, पण मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये कर्णधार सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, याला कारण ठरतंय ते मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी दिलेलं उत्तर.
advertisement
5/8
आयपीएलच्या मागच्या मोसमात रोहित शर्मा बहुतेक सामने इम्पॅक्ट सब म्हणून खेळला, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला. रोहितसारखा अनुभवी खेळाडू मैदानात कर्णधाराची मदत करू शकतो, पण त्याला डग आऊटमध्ये बसवल्यामुळे मुंबई इंडियन्सना टीकेचा सामना करावा लागला.
advertisement
6/8
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात रोहित शर्मा इम्पॅक्ट सब नसेल, तसंच त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल, असं महेला जयवर्धनेने स्पष्ट केलं, पण हे सांगतानाच महेला जयवर्धनेने सूर्यकुमार यादवबद्दल संकेत दिले.
advertisement
7/8
आयपीएलच्या मागच्या मोसमात रोहितला दुखापत होती, त्यामुळे आम्ही त्याला इम्पॅक्ट सब म्हणून वापरलं. मुंबईकडे इम्पॅक्ट सब म्हणून खेळवण्यासाठी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोनच पर्याय होते, कारण ते दोघेही बॉलिंग करत नाहीत, असं वक्तव्य महेला जयवर्धनेने केलं.
advertisement
8/8
महेला जयवर्धनेचं हे वक्तव्य पाहता यंदाच्या मोसमात रोहित शर्मा बॅटिंग आणि पूर्णवेळ फिल्डिंग करणार असेल तर सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट सब म्हणून वापरलं जाऊ शकतं. असं झालं तर सूर्याला प्लेइंग इलेव्हनऐवजी इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात आणलं जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : वर्ल्ड कप जिंकवूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नाही... सूर्याला मुंबई इंडियन्समध्ये वेगळाच रोल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल