TRENDING:

टीव्हीपासून करिअरला सुरुवात, आता बॉलिवूड-OTT वर राज! 'सूबेदार'च्या राधिका मदानची संपत्ती किती?

Last Updated:
Subedaar Radhika Madan : ओटीटीवरील सूबेदार फिल्ममध्ये अनिल कपूरपेक्षाही अभिनेत्री राधिका मदानची जास्त चर्चा होते आहे. जी टीव्हीनंतर बॉलिवूड आणि आता ओटीटीवरही ती राज करते आहे.
advertisement
1/7
टीव्हीपासून करिअरला सुरुवात, आता बॉलिवूड-OTT वर राज! 'सूबेदार'च्या राधिका मदानची संपत्ती किती?
अभिनेता अनिल कपूरची ओटीटीवरील फिल्म सूबेदार ज्यात अभिनेत्री राधिका मदानही आहे. राधिकाने अनिल कपूरच्या मुलीची श्यामाची भूमिका केली आहे. अनिल कपूरपेक्षा राधिकाचीच चर्चा जास्त होते आहे.
advertisement
2/7
राधिका जिने टीव्हीपासून तिच्या करिअरला सुरुवात केली आहे. सगळ्यात आधी ती 2014 साली आलेल्या मेरी आशिकी तुम से ही या सीरिअलमध्ये दिसली. या मालिकेमार्फत ती घराघरात पोहोचली तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली.
advertisement
3/7
टीव्हीनंतर राधिकाची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. 2018 साली तिची पहिली फिल्म आली 'पटाखा'.  डेब्यू फिल्मसाठी तिला अनेक अवॉर्ड मिळाले.
advertisement
4/7
2022 साली तिला दादासाहेब फाळके पीपल्स बेस्ट चॉईस पुरस्कार मिळाला. बेस्ट डेब्यू एक्ट्रेसचा झी गोल्ड अवॉर्डही तिने मिळवला आहे. आपल्या पहिल्या डेब्यू फिल्मसासाठी तिने स्टार स्क्रीन अवॉर्डही जिंकला आहे.
advertisement
5/7
या फिल्मनंतर राधिकाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. तिने बऱ्याच फिल्म्स केल्यात. राधिकाने 'मर्द को दर्द नहीं होता', ‘अंग्रेजी मीडियम' अशा काही फिल्म्स केल्या आहेत.
advertisement
6/7
टीव्ही, बॉलिवूडनंतर, तिने ओटीटीवरही पदार्पण केलं. वेब सीरिज 'रे' मध्ये ती दिसली.  ओटीटी वेब सीरिज 'रे' साठी तिला सपोर्टिंग एक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.
advertisement
7/7
2024 मध्ये फोर्ब्समध्ये राधिकाने 30 अंडर 30 लिस्टमध्ये आपलं स्थान बनवलं. Housivity 2026 च्या रिपोर्टनुसार राधिकाचं नेटवर्थ जवळपास 65 कोटी रुपये आहे.  काही रिपोर्टनुसार तिची नेटवर्थ 58 कोटींपेक्षा जास्त आहे. एका फिल्मसाठी ती जवळपास दीड ते अडीच कोटी रुपये घेते अशी माहिती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
टीव्हीपासून करिअरला सुरुवात, आता बॉलिवूड-OTT वर राज! 'सूबेदार'च्या राधिका मदानची संपत्ती किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल