TRENDING:

Kavya Maran : काव्याच्या टीमकडून खेळणार नाही अबरार... 'करोडपती' बनवूनही शेवटी धोकाच!

Last Updated:
सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. द हंड्रेड या इंग्लंडमधल्या क्रिकेट लीगमध्ये काव्याच्या टीमने पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला विकत घेतलं.
advertisement
1/6
काव्याच्या टीमकडून खेळणार नाही अबरार... 'करोडपती' बनवूनही शेवटी धोकाच!
द हंड्रेड मध्ये काव्या मारनची टीम सनरायजर्स लीड्सने पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदला 2.30 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे, पण पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतल्यामुळे काव्या आणि तिची आयपीएल टीम सनरायजर्स हैदराबादवर टीकेची झोड उठली आहे.
advertisement
2/6
पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाही, तरीही काव्या मारनच्या टीमने द हंड्रेड मध्ये पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली. ऑपरेशन सिंदूर वेळी अबरार अहमदने भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती, तरीही त्याला टीममध्ये घेतल्यामुळे काव्या मारन आणि तिच्या टीमला रोषाचा सामना करावा लागतोय.
advertisement
3/6
दुसरीकडे ज्या पाकिस्तानी खेळाडूसाठी काव्या मारनने एवढी मोठी बोली लावली तोच आता द हंड्रेड मधून बाहेर होण्याची शक्यता आहे. याला कारण ठरू शकतं ते पाकिस्तान क्रिकेट टीमचं वेळापत्रक.
advertisement
4/6
इंग्लंडमध्ये द हंड्रेड या स्पर्धेचं आयोजन 21 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान होणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानची टीम 15 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये पाकिस्तान-वेस्ट इंडिज यांच्यात 2 टेस्ट मॅच होणार आहेत.
advertisement
5/6
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अबरार अहमदची पाकिस्तानच्या टीममध्ये निवड व्हायची शक्यता आहे. लवकरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीमची घोषणा करेल. अबरारची पाकिस्तानच्या टीममध्ये निवड झाली, तर त्याला द हंड्रेडमध्ये खेळता येणार नाही.
advertisement
6/6
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 टेस्ट मॅचच्या सीरिजआधी एक 4 दिवसांचा सराव सामनाही होणार आहे. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. सीरिजची पहिली टेस्ट क्वीन्स पार्क ओव्हल आणि दुसरी टेस्ट ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमीमध्ये होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Kavya Maran : काव्याच्या टीमकडून खेळणार नाही अबरार... 'करोडपती' बनवूनही शेवटी धोकाच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल