TRENDING:

World Hottest Chilli : जगातील सगळ्यात तिखट मिरची कोणती? खाणं दूर हात लावायचीही हिंमत होणार नाही

Last Updated:
World Hottest Chilli : मी खूप तिखट खातो, मला झणझणीत आवडतं, असं म्हणत मिरच्या अशाच चावून खाणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येक मिरची कमी-जास्त प्रमाणात तिखट असते. पण जगात सगळ्यात जास्त तिखट मिरची कोणती माहिती आहे का?
advertisement
1/7
जगातील सगळ्यात तिखट मिरची कोणती? खाणं दूर हात लावायचीही हिंमत होणार नाही
भारतीय असो, मेक्सिकन असो किंवा थाय खाद्यसंस्कृती मिरची हा जगभरातील खाद्यपदार्थांचा अविभाज्य भाग आहे. जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत, त्यातील काही कमी तिखट आणि फक्त लाल रंगासाठी  तर काही तिखटासाठी प्रसिद्ध आहेत.
advertisement
2/7
भारतातील सगळ्यात तिखट मिरची म्हणजे भूत जोलोकिया जी आसाममध्ये मिळते आणि जी एकेकाळी जगातीलही सगळ्यात तिखट मिरची होते. पण आता या मिरचीला मागे टाकणारी मिरची. जगातील अशी सगळ्यात तिखट मिरची कोणती तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
3/7
त्याआधी कोणती मिरची तिखट हे कसं काय मोजलं जातं, ते पाहुयात.  मिरचीचा तिखटपणा Scoville Heat Units (SHU) या मोजपट्टीवर मोजला जातो. ही स्केल अमेरिकन फार्मासिस्ट Wilbur Scoville यांनी 1912 साली विकसित केली. SHU जितकं जास्त, तितकी मिरची अधिक तिखट.
advertisement
4/7
SHU नुसार जगातील सगळ्यात तिखट मिरची आहे Pepper X. 2023 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची अधिकृत नोंद आहे. अमेरिकेतील ही मिरची याचा SHU सुमारे 26.9 लाख  आहे. ही मिरची इतकी तिखट आहे की ती थेट खाणं आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानलं जातं. ही मिरची प्रामुख्याने सॉस, अर्क किंवा संशोधनासाठी वापरली जाते.
advertisement
5/7
पेपर एक्सआधी कॅरोलिना रिपर ही जगातील सगळ्यात तिखट मिरची होती. तिचा SHU सुमारे 22 लाख होता. भारतातील भूत जोलोकियासुद्धा एकेकाळी जगातील सर्वात तिखट मिरची होती, याचीही गिनीज बुकमध्ये नोंद झाली होती. याचा SHU सुमारे 10 लाख होता. यानंतर फक्त भारताचं म्हणाल तर भूत जोलोकियानंतर आंध्र प्रदेशमधील गुंटूर मिरचीचा क्रमांक लागतो.
advertisement
6/7
मिरचीमध्ये Capsaicin नावाचा घटक असतो, ज्यामुळे ती तिखट लागते. कॅप्सायसिन जिभेवरील उष्णतेचे रिसेप्टर्स सक्रिय करतं, त्यामुळे प्रत्यक्षात मेंदूला जळजळ झाल्यासारखा सिग्नल मिळतो.
advertisement
7/7
Pepper X किंवा Carolina Reaper सारख्या मिरच्या थेट खाल्ल्यास तीव्र पोटदुखी, उलटी, मळमळ, घशाला आणि अन्ननलिकेला इजा,रक्तदाब वाढणं, श्वास घेण्यास त्रास असे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच डॉक्टर आणि अन्नतज्ज्ञ अशा मिरच्या थेट खाण्याचा सल्ला देत नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
World Hottest Chilli : जगातील सगळ्यात तिखट मिरची कोणती? खाणं दूर हात लावायचीही हिंमत होणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल