TRENDING:

Alcohol Fact : दारू प्याल्यावर लोक इंग्रजी का बोलतात? 99 टक्के लोकांना माहितच नसणार दारु कसं शिकवते English

Last Updated:
Why people speak English after drinking alcohol : आपल्याकडे अशा व्यक्तींची थट्टा केली जाते, पण तुम्हाला माहीत आहे का, की दारू पिल्यावर लोक इंग्रजी का बोलतात यामागे चक्क एक वैज्ञानिक कारण आहे?
advertisement
1/10
दारू प्याल्यावर लोक इंग्रजी का बोलतात? 99 टक्के लोकांना माहितच नसणार सायन्स
दारुशिवाय कोणतीही पार्टी अपूर्णच आहे, प्रत्येक पार्टीत किंवा कार्यक्रमात दारु ही लागतेच. पण मित्रांसोबत दारु पिताना तुम्ही अनेकदा नोटीस केलं असेल की जो मित्र दोन शब्द स्पष्ट मराठीत देखील न बोलू शकणारा अचानक दोन पेग गेले की इंग्रजी बोलू लागतो. त्यावेळी आपण हे देखील आवर्जून बोलतो की याला दारु चढलेली दिसतेय.... पण कधी विचार केलाय का की असं का होतं? दारु पोटात गेली की माणूस कसा इंग्रजी बोलतो?
advertisement
2/10
"भाई, आय लव्ह यू" पासून ते जागतिक अर्थकारणापर्यंतचे विषय तो अतिशय आत्मविश्वासाने इंग्रजीत मांडतो. आपल्याकडे अशा व्यक्तींची थट्टा केली जाते, पण तुम्हाला माहीत आहे का, की दारू पिल्यावर लोक इंग्रजी का बोलतात यामागे चक्क एक वैज्ञानिक कारण आहे?
advertisement
3/10
या विषयावर केवळ चर्चाच नाही, तर रीतसर संशोधन झाले आहे. चला तर मग, लिक्विड करेज आणि इंग्रजी भाषेचा काय संबंध आहे, हे सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
4/10
जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजी (Journal of Psychopharmacology) मध्ये प्रकाशित झालेल्या एका प्रसिद्ध संशोधनानुसार, अल्कोहोलचे कमी प्रमाणात सेवन केल्याने परकी भाषा बोलण्याच्या कौशल्यात सुधारणा होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल आणि मास्ट्रिच युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी 50 जर्मन विद्यार्थ्यांवर हा प्रयोग केला होता.
advertisement
5/10
1. आत्मविश्वासाचा वाढता आलेख (The Confidence Factor)कोणतीही परकी भाषा बोलताना आपल्या मनात 'आपण काहीतरी चुकेल का?' किंवा 'लोक आपल्याला हसतील का?' अशी भीती असते. विज्ञानाच्या भाषेत याला 'Language Anxiety' म्हणतात. दारू पिल्यावर मेंदूतील 'प्रि-फ्रंटल कॉर्टेक्स' (Pre-frontal Cortex) सुस्त होतो, जो आपल्याला सामाजिक शिष्टाचार आणि भीतीची जाणीव करून देतो. भीतीची ही भिंत कोसळली की, व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने आणि बिनधास्तपणे इंग्रजी शब्द उच्चारू लागते.
advertisement
6/10
2. 'लिक्विड करेज'ची किमयाअल्कोहोलमुळे मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी वाढते, ज्यामुळे आपल्याला उत्साही वाटते. यालाच 'Liquid Courage' म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती दारू पिते, तेव्हा तिचे व्याकरण चुकण्याची भीती नष्ट होते. ती व्यक्ती शब्दांचा विचार करण्याऐवजी थेट संवाद साधण्यावर भर देते, ज्यामुळे तिचे इंग्रजी अधिक प्रवाही वाटते.
advertisement
7/10
3. उच्चारातील स्पष्टता (Pronunciation)संशोधनात असे आढळले की, ज्या लोकांनी थोड्या प्रमाणात मद्यपान केले होते, त्यांचे इंग्रजी भाषेतील उच्चार (Pronunciation) मद्यपान न केलेल्या लोकांपेक्षा अधिक स्पष्ट आणि नैसर्गिक होते. मद्यामुळे जिभेचे स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे इंग्रजी शब्दांचे अवघड उच्चार करणे सोपे जाते.
advertisement
8/10
याचा अर्थ असा नाही की दारू प्यायल्याने तुम्ही 'शेक्सपिअर' बनाल. संशोधक हे देखील स्पष्ट करतात की, हा परिणाम केवळ कमी किंवा मर्यादित (Mild dose) प्रमाणात मद्यपान केल्यावरच दिसतो. जर दारूचे प्रमाण वाढले, तर मात्र 'स्लर्ड स्पीच' (Slurred Speech) सुरू होते, म्हणजेच शब्द अडखळू लागतात आणि व्यक्तीला स्वतःचीच भाषा बोलणे कठीण होते.
advertisement
9/10
माणसाची मानसिकता आणि वास्तवआपल्या समाजात इंग्रजीला एका 'स्टेटस'शी जोडले गेले आहे. त्यामुळे सबकॉन्शस माइंडमध्ये (Subconscious Mind) असलेली ही सुप्त इच्छा दारूच्या नशेत बाहेर येते. आपण जे शुद्धीत राहून बोलायला घाबरतो, ते नशेच्या जोरावर बोलण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
10/10
दारू तुम्हाला इंग्रजी शिकवत नाही, तर तुमच्या मनात असलेली भीती काढून टाकते. त्यामुळे तुम्ही इंग्रजी बोलू शकता, हे सिद्ध होते. पण त्यासाठी दारूचा आधार घेण्यापेक्षा स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे हा कधीही चांगला पर्याय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Alcohol Fact : दारू प्याल्यावर लोक इंग्रजी का बोलतात? 99 टक्के लोकांना माहितच नसणार दारु कसं शिकवते English
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल