Tea : गोड खाल्ल्यानंतर चहा पाणचट का लागतो, चहातील साखरेची चव का लागत नाही?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Tea Facts : गोड खाल्ल्यानंतर त्यावर चहा प्यायलो तर चहाची गोड चव लागत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण यामागे नेमकं कारण काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5

चहा म्हटलं की त्याच्यासोबत काही खाणंपिणं आलंच. अशावेळी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. काहीही गोड खाल्लं की त्यानंतर कितीही गोड चहा का असेना त्याची चव लागत नाही. त्यामुळे बरेच लोक चहा पिण्याआधी किंवा चहा पिताना गोड खाणं टाळतात. पण असं का होतं, याचा विचार तुम्ही केला आहे का?
advertisement
2/5
जिभेवर हजारो रिसेप्टर्स असताच जे वेगवेगळी वेगवेगळी चव ओळखतात. जेव्हा आपण मिठाई किंवा तसे काही गोड पदार्थ खातो तेव्हा जिभेवरील स्वीट रिसेप्टर्स गोडव्याने भरतं.
advertisement
3/5
जेव्हा एकच चव जिभेला पुन्हा पुन्हा मिळते तेव्हा ते टेस्ट रिसेप्टर्स त्या चवीची संवेदनशीलता काही कालावधीसाठी कमी करते. वैज्ञानिक भाषेत याला टेस्ट एडेप्टेशन म्हणतात. ज्यामध्ये गोड ओळखणारे जिभेतील स्वीट रिसेप्टर्स काही वेळासाठी कमी होतात.
advertisement
4/5
गोड खाल्ल्यानंतर चहा प्यायलं तर गोड चव ओळखणारं तेच रिसेप्टर्स लगेच गोड चव ओळखू शकत नाही. त्यामुळे गोड खाऊन चहा प्यायल्यानंतर चहा गोड लागत नाही किंवा पाणचट लागतो.
advertisement
5/5
त्यामुळे काही गोड खाल्लं की 15 ते 20 मिनिटानंतर चहा प्यायला तर तो गोड लागेल किंवा गोड खाऊन चहा प्यायचा असेल तर चहामध्ये साखर कमी टाका किंवा गोड खाऊन पाणी प्या आणि नंतर चहा. (सर्व फोटो : AI Generated Image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tea : गोड खाल्ल्यानंतर चहा पाणचट का लागतो, चहातील साखरेची चव का लागत नाही?