Bhaji Chapati : तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाताय भाजी-चपाती; डॉक्टरांनी सांगितली पोळीभाजी खाण्याची योग्य पद्धत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chapati Bhaji : भात, डाळ, भाजी, चपाती असं भारतीय आहाराचं ताट असतं. चपाती भाजी किंवा भाजीपोळी म्हणजे भारतीय आहारातील महत्त्वाचे पदार्थ. पण तुम्ही आजवर ज्या पद्धतीने भाजी-चपाती खात आलात, ती पद्धत चुकीची असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
1/7

चपाती भाजी किंवा पोळी भाजी कित्येकांचा सकाळचा नाश्ता. शाळा, ऑफिस, कॉलेजसाठी टिफिनमध्येही कित्येक जण चपाती-भाजी नेतात.
advertisement
2/7
सामान्यपणे आपण चपाती-भाजी खाताना भाजीमध्ये चपाती बुडवतो आणि ती खातो किंवा लहान मुलांना चपातीमध्ये भाजी टाकून ती रोल करून देतो.
advertisement
3/7
पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने चपाती भाजी खात आहात, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मग आता चपाती भाजी खायची कशी? याची योग्य पद्धतही डॉक्टरांनी दाखवली आहे.
advertisement
4/7
डॉक्टर म्हणाले, की आपण चपाती भाजीत बुडवून किंवा चपातीला भाजी फक्त लावून खातो. यात चपातीचं प्रमाण जास्त आणि भाजीचं प्रमाण कमी असतं.
advertisement
5/7
पण खरंतर चपातीचा छोटा तुकडा आणि भाजी जास्त असं प्रमाण घ्यायचं. चपाती आणि भाताआधी भाजी आहे ती चमच्याने खाऊन संपवण्याचा प्रयत्न करा, असं डॉक्टर म्हणाले.
advertisement
6/7
जर तुम्हाला असं खायचं नसेल तर तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये जसं चपातीमध्ये भाजी रोल करून देता तसंही खाऊ शकता, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
7/7
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ज्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Bhaji Chapati : तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाताय भाजी-चपाती; डॉक्टरांनी सांगितली पोळीभाजी खाण्याची योग्य पद्धत