TRENDING:

Thane Market : पारंपरिक खणाच्या आकर्षक वस्तू, स्वस्तात करा खरेदी, ठाण्यात हे बेस्ट ठिकाण

Last Updated:
या वस्तूमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी डिझाइन्सचा सुंदर संगम दिसून येतो. तुम्हाला या वस्तूंची खरेदी स्वस्तात करता येईल.
advertisement
1/5
पारंपरिक खणाच्या आकर्षक वस्तू, स्वस्तात करा खरेदी, ठाण्यात हे बेस्ट ठिकाण
ठाण्यात सणासुदीचा आनंद आणि घरगुती सजावटीला पारंपरिक स्पर्श देण्यासाठी सखी क्रिएटिव्हसकडे खणाच्या आकर्षक कापडातून बनवलेले विविध होम डेकोर आणि गिफ्टिंग वस्तू उपलब्ध आहेत. या वस्तूमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी डिझाइन्सचा सुंदर संगम दिसून येतो. तुम्हाला या वस्तूंची खरेदी स्वस्तात करता येईल.
advertisement
2/5
या वस्तूमध्ये खणेरी टोपी 299 रुपयांपासून, खणाची ओढणी आणि क्लचेस प्रत्येकी 799 रुपयांपासून उपलब्ध आहेत. भावभीजीच्या ओवाळणीसाठी खास तयार केलेल्या पॉकेट्स 90 रुपये, घर सजावटीसाठी तोरण 500 रुपयांपासून विक्रीस आहेत.
advertisement
3/5
तसेच खणाच्या छोट्या डायरीज 100 रुपये, फ्रेम्स 250 ते 450 रुपये, पाठ आसन आणि पिलो कव्हर 350 रुपये याप्रमाणे विविध वस्तू ग्राहकांच्या पसंतीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय खण डायरी 399 रुपये, नेम प्लेट 999 रुपये आणि फ्रिज मॅग्नेट्सही उपलब्ध आहेत जे सणाच्या काळात गिफ्टिंगसाठी किंवा घर सजावटीसाठी खास पर्याय ठरू शकतात.
advertisement
4/5
या सर्व वस्तू 100 रुपयांपासून सुरू होतात ज्या कोणत्याही बजेटमध्ये सहज बसतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार पर्याय निवडता येतात. ठाण्यात यांचे वर्कशॉप असून इच्छुक ग्राहक थेट तिथे जाऊन किंवा सखी क्रिएशन्स या इंस्टाग्राम पेजवरून सहज ऑर्डर करू शकतात. सणासुदीच्या उत्सवात पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा उत्तम संगम पाहण्यास मिळतो.
advertisement
5/5
पारंपरिक कापड आणि डिझाइन्सचा वापर करून घराला आणि भेटवस्तूंना एक वेगळाच, सांस्कृतिक आणि आकर्षक लूक देता येतो. त्यामुळे सणाच्या काळात खास गिफ्टिंगसाठी किंवा स्वतःसाठी काहीतरी वेगळं आणि खास खरेदी करायची इच्छा असल्यास सखी क्रिएटिव्हस हा सर्वोत्तम पर्याय आहे असे सखी क्रिएशन्सचे ओनर म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Thane Market : पारंपरिक खणाच्या आकर्षक वस्तू, स्वस्तात करा खरेदी, ठाण्यात हे बेस्ट ठिकाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल