अजितदादांची भेट अपुरीच राहिली, अहिल्यानगरचा चिमुकला थेट विधानभवनात पोहोचला, सुनेत्रा पवारांची घेतली भेट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एका चिमुकल्याचे सुंदर हस्ताक्षर पाहून राज्याचे लोकप्रिय नेते दिवंगत अजितदादा पवार फार भावुक झाले होते.
advertisement
1/7

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एका चिमुकल्याचे सुंदर हस्ताक्षर पाहून राज्याचे लोकप्रिय नेते दिवंगत अजितदादा पवार फार भावूक झाले होते. त्या चिमुकल्याचे कौतुक करत त्याला भेटण्यासाठी त्यांनी बोलावलेही होते.
advertisement
2/7
मात्र नियतीच्या खेळामुळे दादा आणि त्या विद्यार्थ्याची प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीच अजितदादा यांनी जगाचा निरोप घेतला आणि ती भेट अपुरीच राहिली. आज विधान भवनात त्या अपूर्ण राहिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा मिळाला.
advertisement
3/7
राज्याच्या कार्यक्षम उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी त्या चिमुकल्याची भेट घेत त्याचे मनापासून कौतुक केले. त्याच्या हस्ताक्षराचे आणि मेहनतीचे त्यांनी विशेष अभिनंदन करत त्याला प्रोत्साहन दिले.
advertisement
4/7
यावेळी त्या चिमुकल्याने छोट्याशा भारताच्या नकाशावर अजितदादांच्या आठवणीतून सुनेत्रा वहिनी पवार यांच्याबद्दल सुंदर मजकूर लिहित एक छोटेसे पत्र त्यांना भेट म्हणून दिले.
advertisement
5/7
या भावनिक क्षणाने उपस्थित सर्वांनाच दिवंगत अजितदादा पवार यांची आठवण करून दिली.
advertisement
6/7
चिमुकला विधान भवनात दाखल होताच उपस्थितांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आणि त्या निमित्ताने अजितदादांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
advertisement
7/7
सुनेत्रा वहिनी पवार यांनीही या भेटीला भावनिक आणि प्रेरणादायी क्षण असल्याचे सांगत विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
अजितदादांची भेट अपुरीच राहिली, अहिल्यानगरचा चिमुकला थेट विधानभवनात पोहोचला, सुनेत्रा पवारांची घेतली भेट