TRENDING:

कॉल करताच स्क्रीन बंद का होते? 90% लोकांना माहिती नाही खरं कारण

Last Updated:
अनेक लोकांना वाटतं की, स्मार्टफोनची स्क्रीन आपोआप बंद होणे हे फोन खराब होण्याचा संकेत आहे. मात्र जास्तीत जास्त प्रकरणात हे फोनचे एक स्मार्ट फीचर असते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/9
कॉल करताच स्क्रीन बंद का होते? 90% लोकांना माहिती नाही खरं कारण
सध्याच्या काळात स्मार्टफोनमध्ये स्क्रीन स्वतःच बंद होणे एक सामान्य एक्सपीरियन्स आहे. अनेक यूझर्सला वाटतं की, हे खराब झाल्यामुळे झालं आहे. मात्र जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये हे फोनच्या डिझाइनचा भाग असते. मुख्यरुपात दोन्ही कारणांमुळे स्क्रीन ऑटोमॅटिकली ऑफ होते. स्क्रीन टाइमआउटर फीचर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर. हे दोन्ही फीचर्स बॅटरी बचत आणि यूझर एक्सपीरियन्स बेस्ट बनवण्यासाठी तयार केले आहेत.
advertisement
2/9
प्रथम, स्क्रीन टाइमआउट बद्दल बोलूया. ही एक बिल्ट-इन सेटिंग आहे जी जवळजवळ प्रत्येक Android आणि iOS फोनमध्ये आढळते. जेव्हा तुम्ही काही सेकंद किंवा मिनिटे स्क्रीनला स्पर्श करत नाही किंवा त्याच्याशी संवाद साधत नाही, तेव्हा स्क्रीन आपोआप बंद होते.
advertisement
3/9
याचा हेतू बॅटरी बचत करणे आहे. स्क्रीन मोबाईलची सर्वात जास्त पॉवर खाणारी गोष्ट असते. स्क्रीन नेहमी ऑन ठेवली. तर बॅटरी काही तासांत संपू शकते. यामुळे फोन मॅन्युफॅक्चरर्स डिफॉल्टरित्या टाइमआउट 15 सेकंड, 30 सेकंड किंवा 1 मिनिट ठेवतात.
advertisement
4/9
तुम्हाला वाटत असेल की, स्क्रीन खूप लवकर बंद होत आहे, तर तुम्ही ती सहजपणे बदलू शकता. सेटिंग्जमध्ये जा, डिस्प्ले किंवा स्क्रीन आणि ब्राइटनेस विभागात स्क्रीन टाइमआउट किंवा स्लीप पर्याय निवडा आणि वेळ वाढवा - उदाहरणार्थ, 2 मिनिटे, 5 मिनिटे किंवा 10 मिनिटे.
advertisement
5/9
काही फोन पॉवर सेव्हिंग मोड ऑन असताना हा वेळ आपोआप कमी करतात, ज्यामुळे स्क्रीन जलद बंद होते. हे फीचर केवळ बॅटरीचे आयुष्य सुधारत नाही तर फोनचे ओव्हरहाटिंग देखील कमी करते.
advertisement
6/9
दुसरे प्रमुख कारण म्हणजे, प्रॉक्सिमिटी सेन्सर. हे लहानचं सेन्सर फोनच्या वरच्या भागात (फ्रंट कॅमेरा आणि स्पीकरजवळ) असते. जेव्हा तुम्ही फोनने कॉल करत असतात आणि फोनला कानाला लावतात. तेव्हा हा सेन्सर तुमच्या चेहऱ्याची किंवा कानाची जवळीक ओळखतो आणि स्क्रीन लगेच बंद होते.
advertisement
7/9
याचे दोन फायदे होतात : पहिले चुकीने कान किंवा कालाने एखादं बटण दाबलं (जसं म्यूट, होल्ड किंवा डिस्कनेक्ट) जाण्याचा धोका नसतो. दुसरे कॉल दरम्यान स्क्रीन ऑफ राहिल्याने बॅटरीची खुप बचत होते. कॉल संपल्यावर किंवा फोन दूर केल्यावर स्क्रीन पुन्हा ऑन होते.
advertisement
8/9
कधीकधी प्रॉक्सिमिटी सेन्सर घाण, स्क्रीन प्रोटेक्टर किंवा त्यावर झाकलेल्या केसमुळे खराब होतो, ज्यामुळे स्क्रीन अयोग्यरित्या ब्लिंक होते. अशा परिस्थितीत, सेन्सर हळूवारपणे स्वच्छ केल्याने किंवा ते तपासण्यासाठी केस काढून टाकल्याने मदत होऊ शकते.
advertisement
9/9
मोबाईलची स्क्रीन स्वतःच बंद होणे कोणतीही समस्या नाही. तर एक स्मार्ट फीचर आहे. हे बॅटरी लाइफ वाढवते. नको असलेल्या टचपासून बचाव करते आणि फोनला सुरक्षित ठेवते. टाइमआउट वाढणे किंवा सेन्सर चेक केल्यानंतरही समस्या तशीच राहिली तर ओव्हरहीटिंग, बॅटरी इश्यू किंवा सॉफ्टवेयर ग्लिच होऊ शकते. तेव्हा सर्व्हिस सेंटरला दाखवणे बेस्ट ठरते. मात्र 90% प्रकरणांमध्ये हे दोन फीचर्स जबाबदार असतात. समजदारीने या सेटिंग्सचा वापर केला तर फोन दीर्घकाळ चांगला चालेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
कॉल करताच स्क्रीन बंद का होते? 90% लोकांना माहिती नाही खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल