TRENDING:

Banana : केळं पूर्ण काय अर्धही सोलून खाऊ नये; ही आहे केळी खाण्याची योग्य पद्धत

Last Updated:
How To Eat Banana : सामान्यपणे आपण केळी हातांनी त्याची साल सोलून ती काढून खातो. घरी ठिक आहे, पण हॉटेलमध्ये मात्र केळं खाण्याची पद्धत वेगळी असते.
advertisement
1/7
Banana : केळं पूर्ण काय अर्धही सोलून खाऊ नये; ही आहे केळी खाण्याची योग्य पद्धत
केळं सामान्यपणे आपण त्याची साल काढून खातो. तुम्ही पाहिलं असेल लोक केळ्याची पूर्ण साल काढतात आणि नंतर खातात. पण केळ्याची पूर्ण साल काढून ते खाऊ नये, चांगलं दिसत नाही, असं म्हणतात. अशा पद्धतीने केळं खाताना ते हातालाही लागतं.
advertisement
2/7
त्यामुळे बहुतेक लोक केळं अर्धवट सोलतात.  अर्ध्यापर्यंतची साल खातात आणि जसं वरचं केळं संपतं तशी खालील साल काढून मग ते खातात. या पद्धतीने केळं खाणं चांगलं मानलं जातं, तसंच केळं हाताला चिकटतही नाही.
advertisement
3/7
पण अर्धवट साल काढून केळं खाण्याची ही पद्धतही चुकीची आहे, असं सांगितलं तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल. गम केळं खायचं कसं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
4/7
केळं कसं खायचं, केळं खाण्याची योग्य पद्धत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही आजवर चुकीच्या पद्धतीने केळं खात होता, हे समजेल.
advertisement
5/7
केळं एका ताटात आडवं ठेवायचं. एका हातात बटर नाईफ आणि एका हातात फोर्क घ्यायचा. केळ्याचा देठाकडील भाग म्हणजे सुरुवातीचं टोक काढून टाकायचं.
advertisement
6/7
आता केळ्याच्या मध्यभागी फोर्ट टाकून बटर नाइफने आडवी साल चिरायची. साल दोन्ही बाजूंनी वेगळी करायची. केळ्याचे नाइफने छोटे तुकडे करून फोर्कमध्ये घेऊन ते खायचे.
advertisement
7/7
इन्स्टाग्राम अकाऊंटवर केळं खाण्याची ही पद्धत व्हायरल होते आहे. घरी तुम्ही कसंही केळं खा. पण केळं खाण्याची ही पद्धत तुम्हाला हॉटेलमध्ये कामी येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Banana : केळं पूर्ण काय अर्धही सोलून खाऊ नये; ही आहे केळी खाण्याची योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल