TRENDING:

कोरड्यावाहू जमिनीत एकरी १८ क्विंटल कापसाचे होईल उत्पन्न, अकोला पॅटर्न सारखी करा शेती

Last Updated:
शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रयोग होत आहेत. यापैकीच एक म्हणजे सघन कापूस लागवडीचा अकोला पॅटर्न. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि उत्पादनात दुप्पट ते तिप्पट वाढ करणारा हा पॅटर्न विदर्भात अतिशय लोकप्रिय ठरला. मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी देखील अकोला पॅटर्न पद्धतीची शेती आता करू लागलेत. जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथील जगदीश जाधव या तरुण शेतकऱ्याने देखील सघन कापूस लागवडीचा प्रयोग केला आहे. पाहुयात काय आहेत कापूस लागवडीचे वैशिष्ट्य
advertisement
1/6
कोरड्यावाहू जमिनीत एकरी १८ क्विंटल कापसाचे होईल उत्पन्न, अकोला पॅटर्नसारखी करा..
शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रयोग होत आहेत. यापैकीच एक म्हणजे सघन कापूस लागवडीचा अकोला पॅटर्न. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि उत्पादनात दुप्पट ते तिप्पट वाढ करणारा हा पॅटर्न विदर्भात अतिशय लोकप्रिय ठरला.
advertisement
2/6
मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी देखील अकोला पॅटर्न पद्धतीची शेती आता करू लागलेत. जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथील जगदीश जाधव या तरुण शेतकऱ्याने देखील सघन कापूस लागवडीचा प्रयोग केला आहे. पाहुयात काय आहेत कापूस लागवडीचे वैशिष्ट्य
advertisement
3/6
मराठवाडा विदर्भात कापूस ही एक प्रमुख कॅश क्रॉप आहे. या भागातील बहुतेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने चार बाय दोन फुटावर किंवा पाच बाय दीड फुटावर कापसाची लागवड करतात. या पद्धतीत शेतकऱ्यांना एकरी आठ ते बारा क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळतं.
advertisement
4/6
तर कोरडवाहू शेतकऱ्यांना उत्पन्न पाच ते सहा क्विंटलपर्यंत देखील मर्यादित राहतं. परंतु अकोला पॅटर्ननुसार एक एकर शेतामध्ये तब्बल पाच ते सहा बॅग कपाशीची लागवड केली जाते. एका एकरात तब्बल 29 हजार कपाशीची रोपे लावली जातात. दोन रोपांमधील अंतर केवळ अर्धा फूट तर दोन ओळींमधील अंतर 3 फूट ठेवले जाते.
advertisement
5/6
कपाशीची वाढ मर्यादित राहावी यासाठी वाढ रोखणाऱ्या औषधांची फवारणी केली जाते. एका झाडास दहा ते पंधरा बोंडे लगडल्यास 12 ते 18 क्विंटल उत्पन्न सहज मिळतं. हे बोंडांची संख्या वाढली तर उत्पन्न 18 ते 22 क्विंटलपर्यंत वाढत असल्याचे शेतकरी जगदीश जाधव यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
advertisement
6/6
कापूस लागवडीची ही पद्धत कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ज्या शेतामध्ये एकरी पाच ते सहा क्विंटल कापसाचे उत्पन्न होतं, त्या शेतकऱ्यांनी तर अवश्य अकोला पॅटर्ननुसार कापसाची लागवड करावी, असे आवाहन देखील त्यांनी इतर शेतकऱ्यांना केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
कोरड्यावाहू जमिनीत एकरी १८ क्विंटल कापसाचे होईल उत्पन्न, अकोला पॅटर्न सारखी करा शेती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल