IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 43 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 2-1ने ही मालिका खिशात घातली आहे. या सामन्या ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 412 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं होतं.या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट दिली. टीम इंडियाच्या पोरी लढल्या भिडल्या आणि 369 धावांपर्यंत मजल मारू शकल्या आणि त्यांचा पराभव झाला. पण या सामन्यात टीम इंडियाच्या हातून शेवटच्या क्षणी झालेली चूक अख्खी मॅच फिरवून गेली आणि टीम इंडियाने हातून सामना गमावला.
advertisement
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 413 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात खराब झाली होती.कारण प्रतिका रावल अवघ्या 10 धावांवर बाद झाली होती. तिच्या पाठोपाठ हरलीन देओल देखील 11 धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृती मंधना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरने भारताचा डाव सावरला होता. दोघांनी मैदानात टीचून फलंदाजी केली आणि भारताचा डाव 200 पार नेला होता.
या दोन्ही खेळाडूंच्या बळावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 212 धावा टीम इंडिया 30 ओव्हरमध्ये सहज पुर्ण करत होतील असे वाटत होते.पण मध्येच ट्विस्टला आला. अर्धशतक ठोकून पुढे खेळत असलेली हरमनप्रीत कौर 53 धावांवर ऑल आऊट झाली. तिच्या पाठोपाठ स्मृती मंधाना देखील 125 धावांची शतकीय खेळून बाद झाली. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 17 चौकार मारले होते.
भारताच्या या दोन्ही महत्वाच्या विकेट पडल्यानंतर हा सामना हातातून जाईल असेच वाटत होते. दिप्ती शर्मान टीम इंडियाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. कारण एका बाजूने विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला भारताचा डाव सावरत ती उभी होती. या दरम्यान तिने ऑस्ट्रेलियाचा एकाकी लढत देत भारताला 350 धावांच्या पल्ल्याआड आणले होते.आता इथून विजय खूपच जवळ दिसत होता. इतक्यात घात झाला आणि दिप्ती शर्मा 72 धावांवर आऊट झाली.
दिप्ती आऊट होताच मॅच संपूर्ण फिरली आणि ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात आली.त्यानंतर स्नेहा राणाने भारताला जिंकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पण 35 धावांवर आऊट होताच आणखी दोन झटपट विकट पडले आणि टीम इंडियाचा डाव 369 धावांवर ऑल आऊट झाला. अशाप्रकारे भारताचा 43 धावांनी पराभव झाला.
ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करताना 412 धावांवर ऑल आऊट झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने 138 धावांची शतकीय खेळी केली होती.या खेळीत तिने 23 चौकार आणि एक षटकार लगावला होता. तिच्या जोडीला जॉर्जिया वोलीने 81 धावांची आणि एलीस पेरीने 68 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 412 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून
या सामन्यात अरूणधती रेड्डीने 3 तर रेणुका ठाकूर आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या होत्या.तर क्रांती गौड आणि स्नेहा राणाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या होत्या.दोन्ही संघ या सामन्याआधी 1-1 ने बरोबरीत होते.त्यामुळे हा सामना निर्णायक होता.त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून 2-1 ने मालिका जिंकली.