TRENDING:

BMC Election: ठाकरे कुटुंबातलं शेंडेफळ तेजस ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा, शाखांना भेटी

Last Updated:
मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात तेजस ठाकरे मैदानात उतरले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखांना भेटी दिल्या.
advertisement
1/5
BMC प्रचाराला तेजस ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा, शाखांना भेटी
मुंबई महापालिकेची सत्ता राखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या साथीने यंदाची निवडणुकीला सामोरे जाणार आहे. विधानसभेला राज्यात तितकेसे यश न मिळाल्याने किमान मुंबईतला मतदार आपल्या पाठीशी उभा आहे, हे दाखवून देण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.
advertisement
2/5
यादृष्टीने निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहे. त्यादृष्टीने शनिवारी त्यांनी पहिले पाऊल टाकले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखांना भेटी दिल्या.
advertisement
3/5
विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबातील शेंडेफळ तेजस ठाकरे हे देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. त्यांनीही शिवसैनिकांनी आपुलकीने संवाद साधत शाखांची माहिती घेतली. निवडणूक विषयी चर्चा केली.
advertisement
4/5
प्रभाग क्रमांक ९२ चे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरुण कांबळे यांना उद्धव ठाकरे यांनी शाखेत येऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अरूण कांबळे यांच्याकडून प्रचाराची माहिती घेतली.
advertisement
5/5
मुंबईत अतिशय सक्रिय असलेल्या शिवसेना शाखांना भेटी देऊन मुंबई पिंजून काढण्याची उद्धव ठाकरे यांची रणनीती असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय पुढच्या दोन ते तीन दिवसांत सभांचा धडाकाही सुरू होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
BMC Election: ठाकरे कुटुंबातलं शेंडेफळ तेजस ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा, शाखांना भेटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल