माँ जिजाऊंच्या सिंदखेडराजात अनेक ऐतिहासिक मुर्ती कचऱ्यात, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Historical Statues Found In Garbage : माँ जिजाऊ यांची जन्मभूमी सिंदखेडराजा येथे ऐतिहासिक मुर्त्या कचऱ्यात सापडल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे.
advertisement
1/5

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक मुर्त्या कचऱ्यात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरातत्व विभागाचे साफ दुर्लक्ष दिसून आल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
2/5
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. या ठिकाणी एकेकाळी राजे लखोजीराव जाधव हे वास्तव्यास होते. ऐतिहासिक अनुषंगाने बुलडाण्याचा विशेष महत्व आहे.
advertisement
3/5
मात्र या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यामध्ये चक्क ऐतिहासिक मुर्त्या पडलेल्या आढळून आल्या आहेत. त्या मुर्त्या अतिशय मौल्यवान असून त्याकडे पुरातत्त्व विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.
advertisement
4/5
पुरातत्व विभागाच्या ढिसाळपणामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी माँ जिजाऊ यांचा जन्म झाला, त्याच ठिकाणच्या ऐतिहासिक मुर्त्या जर कचऱ्यात धूळखात पडलेल्या असतील तर ही शासन नेमके काय करते आहे, असा सवाल शिवप्रेमी विचारीत आहेत.
advertisement
5/5
कचऱ्यात टाकलेल्या मूर्त्यांचे जतन करून या सर्व गंभीर गोष्टीला दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. राज्य सरकार यावर काय कार्यवाही करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
माँ जिजाऊंच्या सिंदखेडराजात अनेक ऐतिहासिक मुर्ती कचऱ्यात, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट