बुलढाण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, शेतात गेलेले बापलेक पुरात अडकले; PHOTO आले समोर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
खामगावात गेल्या 24 तासात काल सकाळी 8 वाजता पासून तर आज सकाळी 8 वाजेपर्यंत ६६ मिलिमीटर म्हणजे सुमारे तीन इंच पाऊस झाला.
advertisement
1/5

बुलढाणा जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. खामगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने शेत शिवारांमध्ये पाणीच पाणी साचल आहे. नदी नाले एक झाल्याने अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरलं आहे.
advertisement
2/5
खामगाव शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने बोर्डी नदी दुधडी वरून वाहत आहे. खामगाव शहरातील फरशी येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने खामगाव शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
advertisement
3/5
खामगावात गेल्या 24 तासात काल सकाळी 8 वाजता पासून तर आज सकाळी 8 वाजेपर्यंत ६६ मिलिमीटर म्हणजे सुमारे तीन इंच पाऊस झाला. त्यानंतर सतत पाऊस सुरू असून आज सकाळी मुसळधार पाऊस झालेला आहे.
advertisement
4/5
बुलढाण्यातील गारडगावला पुराच्या पाण्याने वेढले आहे. शेतात गेलेले बाप-लेक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
advertisement
5/5
बुलडाणा जिल्ह्यात रात्रभरपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खामगाव तालुक्यातील अनेक गावांत पाणी शिरले आहे नागापूर गावाला पुर्णपणे पाण्याने घेरले असून स्थानिक नागरीक भयभीत झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
बुलढाण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, शेतात गेलेले बापलेक पुरात अडकले; PHOTO आले समोर