Buldhana News : देवा तू इतका निष्ठूर कसा! वादळात छप्परासह लेक हवेत उडून गेली, 200 फुटांवर सापडला मृतदेह
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Buldhana News : चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
advertisement
1/7

बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. आपल्या घरातील झोक्यात झोपलेल्या सहा महिन्याच्या चिमुकलीसह घरावरील छप्पर उडाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सहा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
advertisement
2/7
चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे या गावात वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. देऊळगाव घुबे गावातील 30 ते 40 घरावरील छप्पर उडून गेली आहेत. या दरम्यान देऊळगाव घुबे गावातील भरत साखरे यांची सहा महिन्याची चिमुकली सई आपल्या घरात झोक्यात झोपली असताना आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने घरावरील छप्पर या झोक्यासह उडून गेले आहे. त्यामुळे सहा महिन्याची चिमुकली सईचा या वादळी वाऱ्याने दुर्दैवी बळी घेतला आहे.
advertisement
3/7
घरावरील छप्पर उडून गेल्यानंतर तब्बल 200 फुटावर हे छप्पर जाऊन पडले, त्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. देऊळगाव घुबे गावात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गावातील तब्बल 30 ते 40 घरावरील छप्पर उडून गेली आहेत तर मोठ मोठी झाडे देखील उन्मळून पडली आहे.
advertisement
4/7
काल आणि परवा खामगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात देखील अशाच पद्धतीचे वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार एन्ट्री मारली. त्यामुळे सर्व नदी नाले एकत्र होत पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
advertisement
5/7
परवा झालेल्या खामगावातील पावसाने खामगावात तीन इंचापेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली तर जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव परिसरात देखील पहिल्याच पावसाने गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं होतं.
advertisement
6/7
देऊळगाव घुबेच्या या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. साखरे कुटुंबात जन्मलेल्या सईवर अवघ्या सहा महिन्यात अशा पद्धतीने काळाने घाला घातल्याने साखरे कुटुंब शोक मग्न झाला आहे.
advertisement
7/7
देऊळगाव घुबे गावात नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी दाखल होत आहेत. तर स्थानिक राजकीय नेत्यांकडून देखील देऊळगाव घुबे तील साखरे कुटुंबीयांसह नुकसानग्रस्त गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : देवा तू इतका निष्ठूर कसा! वादळात छप्परासह लेक हवेत उडून गेली, 200 फुटांवर सापडला मृतदेह