Buldhana News : घरातून सारखा कशाचातरी आवाज येत होता, कारण समोर येताच अख्ख्या गावाला घाम फुटला
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
Buldhana News : बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घरातून सारखा कशाचातरी आवाज येत होता, कारण समोर येताच अख्ख्या गावाला घाम फुटला
advertisement
1/7

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पळसखेडमधील एका घरामध्ये नाग शिरला. त्यानंतर हा नाग या घरातच ठाण मांडून बसला.
advertisement
2/7
घरातून सारखा कशाचातरी आवाज येत असल्याचं या घरात राहणाऱ्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.
advertisement
3/7
फणा काढून बसलेला तब्बल <a href="https://news18marathi.com/web-stories/viral/what-to-do-if-you-see-snake-know-expert-advice-mhds-1991335/">सहा फुटांचा कोब्रा पाहून</a> कुटुंबातील सदस्यांना घाम फुटला. मात्र त्यांनी घाबरून न जाता या <a href="https://news18marathi.com/tag/snake-news/">नागावर लक्ष ठेवलं</a>.
advertisement
4/7
त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती सर्पमित्रांना दिली, माहिती मिळताच सर्पमित्र तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
5/7
<a href="https://news18marathi.com/photogallery/viral/snake-interesting-fact-how-to-identify-the-age-of-snake-method-told-by-experts-mhsz-1158078.html">नाग मोठा असल्यामुळे</a> तसेच गर्दी पाहून तो आक्रमक झाल्यामुळे सर्पमित्रांना देखील त्याला पकडण्यासाठी बराच वेळ लागला
advertisement
6/7
अखेर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर या <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/knowledge-news-is-a-snake-able-to-remove-its-own-poison-from-the-human-body-l18w-mhij-1163472.html">सापाला रेस्क्यू करण्यात यश</a> आलं. एवढा मोठा साप पाहिल्यानंतर ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं
advertisement
7/7
सर्पमित्रांनी या नागाला पकडून जंगलात सोडून दिलं. नागाचा समावेश हा भारतामध्ये आढळणाऱ्या प्रमुख विषारी सापाच्या प्रजातीमध्ये होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : घरातून सारखा कशाचातरी आवाज येत होता, कारण समोर येताच अख्ख्या गावाला घाम फुटला