TRENDING:

फॉरेनची पाटलीन! चंद्रपूरचा मुलगा, ऑस्ट्रियाची सून; झाडाखाली लग्न अन् बैलगाडीतून वरात, 9 देशांचे वऱ्हाडी

Last Updated:
चंद्रपूरच्या हेमंत पाटील आभारे या तरुणाचं ऑस्ट्रियातील तरुणीशी नुकतंच लग्न झालं. चंद्रपूरमधील हेमंतच्या गावात लग्नसोहळा पार पडला.
advertisement
1/5
चंद्रपूरचा मुलगा, ऑस्ट्रियाची सून; शेतात लग्न, बैलगाडीने वरात, 9 देशांचे वऱ्हाडी
चंद्रपूर जिल्ह्यातल्या दाबगाव मौशी इथल्या तरुणाचं ऑस्ट्रियातील तरुणीशी लग्न पार पडलं. गावातच बैलगाडीतून वरात काढत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा झाला.
advertisement
2/5
सावली गावातील सुकरु पाटील आभारे यांचा मुलगा हेमंत उच्चशिक्षित असून तो युरोपातील एका कंपनीत जॉब करतो. ऑस्ट्रियातील युडीश हरमायनी प्रित्झ हिच्याशी त्याने प्रेमविवाह केला आहे.
advertisement
3/5
हेमंत आणि युडिश यांचे लग्न ठरल्यानंतर ते थेट चंद्रपूरमधील गावात आले. लग्नाची तारीख निश्चित केली पण समारंभासाठी हॉल नसल्याने शेवटी शेतातच लग्न सोहळा करण्यात आला.
advertisement
4/5
शेतातील झाडाखाली लग्नाचे विधी झाले तर बैलगाडीतून पारंपरिक वाद्यांनी वाजत गाजत वरात काढण्यात आली. चार दिवसांपूर्वी दोघांचा लग्न सोहळा पार पडला.
advertisement
5/5
हेमंतच्या लग्नासाठी अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलँड, ऑस्ट्रियासह ९ देशांमधील वऱ्हाडी आले होते. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/चंद्रपूर/
फॉरेनची पाटलीन! चंद्रपूरचा मुलगा, ऑस्ट्रियाची सून; झाडाखाली लग्न अन् बैलगाडीतून वरात, 9 देशांचे वऱ्हाडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल