चंद्रपुरात जन्माला आलं बकऱ्याचं विचित्र पिल्लू, अख्खं गाव पाहायला आलं, शेवटी खड्ड्यात पुरलं, PHOTOS
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
चंद्रपूर (हैदर शेख) : मोतीराम आत्राम यांच्याकडेअसलेल्या बकरीला दोन पिल्लं झाली. त्यातील एक पिल्लू सामान्य होतं. मात्र, दुसरं पिल्लू सोशल मीडियावर सध्या चांगलंच व्हायरल होत आहे
advertisement
1/7

चंद्रपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील चेकबिरडी गावात राहणाऱ्या मोतीराम आत्राम या शेतकऱ्याच्या घरी चमत्कार घडला.
advertisement
2/7
मोतीराम आत्राम यांच्याकडेअसलेल्या बकरीला दोन पिल्लं झाली. त्यातील एक पिल्लू सामान्य होतं. मात्र, दुसरं पिल्लू सोशल मीडियावर सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.
advertisement
3/7
कारण हे पिल्लू बकरीसारखं नाही तर एखाद्या माणसासारखं दिसत होतं. हे पिल्लू एखाद्या वृद्ध माणसासारखं दिसत होतं.
advertisement
4/7
दाढी, माणसासारखे डोळे आणि चेहरा असलेलं हे बकरीचं पिल्लू जन्मताच नाजूक होतं. त्याला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न आत्राम परिवाराने केला. मात्र, त्यांना यश आलं नाही.
advertisement
5/7
एखाद्या वृद्ध माणसासारखा चेहरा असलेलं हे पिल्लू बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती.
advertisement
6/7
हा केवळ जणुकीय बदलाचा परिणाम असल्याचं तज्ञ सांगतात. पिल्लाच्या मृत्यूनंतर गावातच खड्डा खणून आत्राम परिवाराने हे पिल्लू पुरलं.
advertisement
7/7
या दाढी असलेल्या आणि माणसासारखा चेहरा असलेल्या पिल्लाची मात्र सध्या मोठी चर्चा रंगली आहे. हे पिल्लू सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/चंद्रपूर/
चंद्रपुरात जन्माला आलं बकऱ्याचं विचित्र पिल्लू, अख्खं गाव पाहायला आलं, शेवटी खड्ड्यात पुरलं, PHOTOS