पहिला श्रावण सोमवार, खडकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, छ. संभाजीनगरमधील Photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
आज 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. धार्मिकदृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. आज पहिला श्रावण सोमवर आहे. यामुळे भाविकांनी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी विविध मंदिरांमध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. (अपूर्वा तळणीकर/छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)
advertisement
1/6

छत्रपती संभाजी नगर शहरातील खडकेश्वर महादेवाच्या मंदिरामध्येही भाविकांनी सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे.
advertisement
2/6
मंदिराच्या बाहेर अनेक पूजेचे सामान विकणारे विक्रेते हे बसल्याचे दिसून आले.
advertisement
3/6
त्यासोबतच मंदिराच्या आतमध्येही रांगेमध्ये भाविकानी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.
advertisement
4/6
सर्व भाविक हे महादेवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
5/6
श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात शंकराची आराधना केल्याने भाविकांना मोठा लाभ होतो, असे सांगितले जाते.
advertisement
6/6
त्यासोबतच सकाळपासूनच तरुणाईसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेण्यासाठी खडकेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पहिला श्रावण सोमवार, खडकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, छ. संभाजीनगरमधील Photos