TRENDING:

Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होणार, या जिल्ह्यांना हायअलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आठही जिल्ह्यात पाऊस सक्रीय झाला असून आज 4 जिल्ह्यांना यलो तर 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/5
ताशी 40 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यात धो धो कोसळणार, या जिल्ह्यांना हायअलर्ट
मागील 24 तासांपासून राज्यभरातील बहुसंख्य भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पाऊस बरसत आहे. आज 13 सप्टेंबर रोजी पुन्हा पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 4 जिल्ह्यांना यलो तर 2 जिह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज पाहता, जालना आणि छत्रपती संभाजी नगर या दोन जिल्ह्यांना वगळता इतर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात आज विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. आज कोणताही सतर्कतेचा इशारा नसला तरी रविवारी पावसाचा जोर वाढणार आहे.
advertisement
3/5
आज मराठवाड्यातील धाराशिव, बीड, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
4/5
शनिवारी नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
5/5
गेले काही दिवस मराठवाड्यातप पावसाने विश्रांती घेतली होती. पंरतु, पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून संपूर्ण मराठवाडा व्यापला आहे. रविवारपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होणार, या जिल्ह्यांना हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल