Weather Alert: पावसाचा ब्रेक, पण दिलासा नाहीच, मराठवाड्यात धो धो कोसळणार, IMD चा पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातील हवामानात आजपासून मोठे बदल होणार आहेत. पुढील काही दिवस पावसाने ब्रेक घेतला असला तरी मराठाड्याबाबत हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात आज, 30 सप्टेंबरपासून मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने काहीसा ब्रेक घेतला आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी झाला असून गेल्या 2 दिवसांत पावसाची उघडीप राहिली. आज, मंगळवारपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुन्ह पाऊस सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.
advertisement
2/5
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत आज देखील उघडीप राहील. नांदेड वगळता कोणत्याही जिल्ह्याला आज जोरदार पावसाचा इशारा नाही. नांदेडमध्ये मात्र आजपासून पुन्हा पाऊस सक्रीय होत आहे. पुढील 4 दिवस नांदेडला मुसळधार पावसाचा यलो अलर्ट कायम असणार आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाचा जोर कमीच राहणार आहे. पुढील 4 दिवसांसाठी या तिन्ही जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा इशारा नाही. मात्र, ढगाळ हवामानासह या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
हिंगोलीला आज जोरदार पावसाचा इशारा नसला तरी 1 ऑक्टोबरपासून पुन्हा पाऊस सक्रीय होत आहे. तर लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यांत 2 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे. या चारही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/5
गेले काही दिवस धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. तरीही मराठवाड्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून पूरस्थितीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा पाऊस सक्रीय होत असल्याने नांदेडसह इतर जिल्ह्यांतील शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: पावसाचा ब्रेक, पण दिलासा नाहीच, मराठवाड्यात धो धो कोसळणार, IMD चा पुन्हा अलर्ट