TRENDING:

Marathwada Rain: मराठवाड्यात वारं फिरलं, 7 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, 72 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात वारं फिरलं, 7 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, 72 तासांसाठी अलर्ट
राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा वाढला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता सातही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/5
गेल्या काही दिवसांत पावसाची तीव्रता मराठवाड्यात पुन्हा वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र हवामान विभागाने कोणताही सतर्कतेचा इशारा दिलेला नाही. पुढील 24 तासानंतर मात्र संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/5
जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाचा जोर असणार आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
5/5
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. त्यानंतर या जिल्ह्यांतील पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, तुरळक हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्यात वारं फिरलं, 7 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, 72 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल