TRENDING:

Apurva Nemlekar : आता घरी नाही राहू शकत! लग्नाच्या काही दिवसांतच असं का म्हणतेय अपूर्वा नेमळेकर?

Last Updated:
Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नुकतीच हनिमूनसाठी गोव्याला गेली होती. तिथून परत आल्यानंतर ती आता आम्ही घरी राहू शकत नाही असं म्हणतेय. अपूर्वाने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/10
आता घरी नाही राहू शकत! लग्नाच्या काही दिवसांतच असं का म्हणतेय अपूर्वा नेमळेकर?
प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी लग्न केलं. तनुज गोवळकरबरोबर अपूर्वाने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अपूर्वा प्रचंड खुश असून नवऱ्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे.
advertisement
2/10
अपूर्वाने नुकतेच नवऱ्याबरोबरचे गोवा ट्रिपचे फोटो शेअर केले होते. दोघे हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. दोघांचा रोमँटिक अंदाज तिथे पाहायला मिळालं.
advertisement
3/10
गोव्याहून परत येताना अपूर्वा नवऱ्याला घेऊन सावंतवाडी येथे रात्रीस खेळ चालेच्या सेटवर देखील गेली होती. नाईकांच्या वाड्यातील फोटो देखील तिनं शेअर केले होते.
advertisement
4/10
दरम्यान अपूर्वा आणि तिचा नवरा तनुज नुकतेच गोव्याहून मुंबईत परत आले आहेत. पण मुंबईत परत येताच आम्ही आता घरी बसून राहू शकत नाही असं म्हणत अपूर्वाने पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
5/10
लग्नाच्या काही दिवसांतच आम्ही घरी राहू शकत नाही असं अपूर्वा का म्हणाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
6/10
गोवा फिरून आल्यानंतर अपूर्वा आणि तनुज हंपी ट्रिपसाठी निघाले आहेत. गोव्याहून आल्याच्या तीन दिवसांतच दोघांनी हंपी ट्रिप प्लान केली.
advertisement
7/10
अपूर्वाने नवऱ्याबरोबरचा एअरपोर्टवरचा फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय, "हम्पीला दुसरी ट्रिप… आणि घरी येऊन फक्त 3 दिवस झालेत; आम्ही ऑफिशिअल 'घरी बसून राहू शकत नाही' अशा फेजमध्ये आलो आहोत."
advertisement
8/10
अपूर्वाच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात. एकानं लिहिलंय, सध्या तु फाॅर्ममध्ये आहेस. दुसऱ्यानं लिहिलंय, घुमते रहो. आणखी एकानं लिहिलंय, मज्जा आहे, गोवा काय बंगळुरू काय!
advertisement
9/10
अपूर्वाचं तनुजबरोबर दुसरं लग्न केलं आहे. काही वर्षांआधी अपूर्वाचं लग्न झालं होतं मात्र काही कारणांना तिचा डिवोर्स झाला. डिवोर्सच्या जवळपास 8 वर्षांनी अपूर्वाने तिच्या प्रेमाला दुसरा चान्स देत तनुजबरोबर नवा संसार सुरू केला आहे.  
advertisement
10/10
अपूर्वाने तिच्या लग्नाबाबत कुठेच भाष्य केलं नव्हतं. व्हॅलेंटाईन डेला तिनं अत्यंत मोजक्या माणसांमध्ये लग्न केलं. काही दिवसांनी लग्नाचे फोटो शेअर करत अपूर्वाने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पुन्हा लग्नाचा निर्णय घेतल्याचं पाहून चाहत्यांनी देखील तिचं कौतुक करत तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Apurva Nemlekar : आता घरी नाही राहू शकत! लग्नाच्या काही दिवसांतच असं का म्हणतेय अपूर्वा नेमळेकर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल