Marathwada Rain: मराठवाड्यात हवा बदलणार, 24 तासानंतर पाऊस झोडपणार, IMD चा अलर्ट
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासानंतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांत राज्यातील मान्सूनचा जोर कमी झाला आहे. ऐन श्रावण महिन्यात पावसाची तीव्रता कमी असून मराठवाड्यात देखील पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सध्या ओसरलेला आहे. पिकांसाठी आवश्यक असलेला मोठ्या प्रमाणातील पाऊस अद्याप काही भागांमध्ये प्रतीक्षेत आहे. मात्र आज 3 ऑगस्ट रोजी स्थानिक हवामानातील घडामोडींमुळे काही निवडक भागांमध्ये हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत आज श्रावण सरींची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 'सतर्कतेचा' किंवा 'खबरदारीचा' अधिकृत इशारा देण्यात आलेला नाही. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवामानात सौम्य बदल पाहायला मिळत आहेत.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर आकाश ढगांनी भरलेले असण्याची शक्यता असून, या भागांमध्ये हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्‍या सरींसह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यात जुलैमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आता हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासानंतर काही जिल्ह्यांत पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. 4 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड, लातूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्यात हवा बदलणार, 24 तासानंतर पाऊस झोडपणार, IMD चा अलर्ट