Marathwada Rain: सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट होणार, मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाचा जोर वाढला आहे. आज 6 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्याता आला आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यात मागील चार ते पाच दिवसांपासून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तर दुपारी तापमानात वाढ झाल्याने उकाडा देखील वाढला आहे. मराठवाड्यातीली आठ पैकी सहा जिल्ह्यांत आज पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
बीड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी मध्यम पाऊसाची शक्यता आहे. या दोन जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/5
धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत देखील ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या चार जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांसाठी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यातील प्रमुख शहर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण राहील. पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात देखील हीच स्थिती राहणार आहे. दोन्ही जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा नाही.
advertisement
5/5
दरम्यान, मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांत पावसाची तीव्रता कायम राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट होणार, मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना अलर्ट