Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकटाचे ढग, 48 तास धोक्याचे, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबक्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे मराठवाड्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग असून छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात आज छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांत विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/5
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. काही जिल्ह्यांत शेती पाण्यात गेली असून कपाशी, सोयाबीन, तूर पिकांना फटका बसला आहे. तर गाई-गुरांचा मृत्यू झाला असून काही ठिकाणी ती वाहून देखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
advertisement
4/5
गेले 2 दिवस पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु, आता पुन्हा मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झालीये. छ. संभाजीनगरसह बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या आठही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटात पाऊस होईल.
advertisement
5/5
मराठवाड्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर राहील. 26 ते 28 सप्टेंबर सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकटाचे ढग, 48 तास धोक्याचे, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट