Weather Alert: वारे वाहणार, विजा कडाडणार, मराठवाड्यात पुन्हा धो धो कोसळणार, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असून आज 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरू असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. आज पुन्हा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबरचा छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
आज रविवारी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सर्व आठही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस होईल.
advertisement
3/5
मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे राहील.
advertisement
4/5
मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या उर्वरित सात जिल्ह्यांमध्येही मुंबई वेधशाळेने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात दुपारच्या वेळी तीव्र ऊन आणि सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस असे चित्र पाहायला मिळतेय.
advertisement
5/5
दरम्यान, 24 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची व सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या जीविताची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: वारे वाहणार, विजा कडाडणार, मराठवाड्यात पुन्हा धो धो कोसळणार, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट