Weather Alert: स्वेटर अन् शेकोटीनं नाही भागणार, मराठवाड्याला नवा अलर्ट, 5 दिवस महत्त्वाचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Weather update: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. येत्या आठवड्यात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

राज्यातील तसेच मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आज 5 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात किंचित वाढ दिसणार असली तरी थंडीची लाट पूर्णपणे ओसरलेली नाही. कमी दाबाचा पट्टा मागे सरकल्यामुळे येणाऱ्या आठवडाभरात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांचे 5 डिसेंबर रोजी हवामान कसं राहील याबद्दल जाणून घेऊ.
advertisement
2/7
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसभर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून हवा कोरडीच राहील. कमाल तापमान 29.3 अंश तर किमान 13.2 अंश सेल्सिअस राहील. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, बदललेल्या वातावरणामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचे किमान तापमान साधारणपणे 8 अंशावरून 6 अंश सेल्सियसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात, म्हणजे 10 डिसेंबरपर्यंत, किमान तापमान पुन्हा 10 अंशांवर येण्याची स्थिती आहे.
advertisement
3/7
जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता असून दिवसभर सूर्य लपंडाव खेळू शकतो. कमाल तापमान 27.1 अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज असल्याने गारवा प्रकर्षाने जाणवेल. किमान तापमान सुमारे 15.2 अंश सेल्सिअस राहील, याबरोबरच कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/7
परभणी व बीड जिल्ह्यात दिवसभर निरभ्र आकाश राहणार आहे. तसेच येथे गारठा वाढण्याची शक्यता आहे. बीडमध्ये कमाल तापमान 28.4 तर किमान तापमान 16.4 अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असून हवेत वाढलेल्या कोरडेपणामुळे गारठा अधिक जाणवणार आहे. तसेच सकाळच्या वेळेला हाडं गोठवणारी थंडी राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहणार आहे. साधारणतः या दोन जिल्ह्यांमध्ये थंडी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे नांदेडमध्ये कमाल तापमान 32.0 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. मात्र वाऱ्याचा वेग आणि अधूनमधून दिसणारे ढग या दोन्हींचा तापमानावर परिणाम होऊन रात्रीच्या वेळी थंडी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
लातूर जिल्ह्यात आकाश स्वच्छ पाहायला मिळणार आहे. तसेच दुपारच्या वेळेला सूर्यप्रकाशाचे चटके जाणवू शकतात. त्यामुळे थंडी मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी जाणवेल. आकाश निरभ्रच राहणार असून दिवसा सूर्यप्रकाशाची तीव्रता जाणवू शकते. येथील कमाल तापमान सुमारे 28.0 अंश सेल्सिअस तर किमान 15.0 अंश सेल्सिअस असेल. धाराशिव जिल्ह्यातही थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मराठवाड्यातील किमान तापमानात वाढ आहे, मात्र 10 डिसेंबरपर्यंत हा पारा कधीही घसरू शकतो. त्यामुळे थंडीच्या लाटेची शक्यता आहे. आज शुक्रवारी मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, हवामानातील अनियमिततेमुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: स्वेटर अन् शेकोटीनं नाही भागणार, मराठवाड्याला नवा अलर्ट, 5 दिवस महत्त्वाचे!