TRENDING:

Marathwada Weather: वादळीवारे सुटणार, विजा कडाडणार, मराठवाड्यात पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Weather: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात संभाव्य बदल दिसून येत आहेत. मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची चिन्हं दिसू लागली असून 29 जून रोजी आठही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे.
advertisement
1/5
  वादळीवारे सुटणार, विजा कडाडणार, मराठवाड्यात पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात संभाव्य बदल दिसून येत आहेत. मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची चिन्हं दिसू लागली असून 29 जून रोजी आठही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे.
advertisement
2/5
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी हलक्याफुलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर परभणी, नांदेड, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/5
या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विजेच्या गडगडाटासह काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. परिणामी नागरिकांनी विजांच्या वेळी उघड्यावर न फिरता सुरक्षित ठिकाणी थांबावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/5
लातूर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण राहणार असून काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र, जोरदार पावसाचा इशारा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान बदल लक्षात घेऊन शेतीकामांची आखणी करावी, असं कृषी तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
5/5
बहुतांश भागांमध्ये आधीच पेरण्या झालेल्या असल्यामुळे आता पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. दरम्यान हवामान विभाग वेळोवेळी अद्ययावत माहिती देत असून नागरिकांनी ती लक्षपूर्वक पाहावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षितता बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: वादळीवारे सुटणार, विजा कडाडणार, मराठवाड्यात पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल