TRENDING:

पावसाची सुट्टी नाहीच! मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यात दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5
पावसाची सुट्टी नाहीच! मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट
दिवाळीआधी राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मात्र अजूनही परतीच्या पावसाचं संकट कायम आहे. दिवाळीच्या आनंदावर पाऊस विरजण घालणार आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी देखील काही जिल्ह्यांत तुरळक पाऊस झाला.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं असेल. शहरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्याला संभाजीनगर शहरात ऑक्टोबरचा तडाखा जाणवत आहे. पण सकाळी हलकी थंडी पडायला सुरुवात झालेली आहे.
advertisement
4/5
तर जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये 72 तास मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.
advertisement
5/5
यामुळे तूर पिकांला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी दिवाळीच्या काळात पडणाऱ्या या पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे, असं सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पावसाची सुट्टी नाहीच! मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल