मराठवाड्यात थंडीचा जोर कायम, परभणीमध्ये पारा घसरला, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
राज्यात गेल्या आठवड्यापासून परत एकदा थंडीने जोर धरला आहे. मराठवाड्यातील तापमानात मोठी घट झाली आहे.
advertisement
1/5

डिसेंबमध्ये महिन्याचा सुरुवातील अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. पण गेल्या आठवड्यापासून परत एकदा थंडीने जोर धरला आहे. मराठवाड्यातमध्ये थंडीचा कडाका वाढला असून काही ठिकाणी पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.
advertisement
2/5
मराठवड्यामध्ये सर्वांत कमी तापमान परभणीमध्ये नोंदवलं गेलं आहे. परभणीमध्ये आज किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढे राहील. जालना, बीड आणि धाराशिवमध्ये किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
advertisement
3/5
नांदेड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस असेल. या ठिकाणी आज हवामान हे कोरडे असेल.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस असेल. किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस राहील. यामुळे सकाळी आणि रात्री कडाक्याची थंडी आहे आणि दिवसभर हलकी थंडी देखील वाजण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
थंडीचा जोर वाढल्यामुळे वातावरणात बदल होत आहे. तरी नागरिकांनी स्वतःचा आरोग्य जपावे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. फळाबगची काजळी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात थंडीचा जोर कायम, परभणीमध्ये पारा घसरला, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?