TRENDING:

पहिलीच भेट अन् 6 तास गप्पा, अपूर्वा-अंशुमनची 'अरेंज मॅरेज'वाली Love Story

Last Updated:
आई कुठे काय करते फेम अपूर्वा गोरे आणि शाळा फेम अंशुमन जोशी यांचं नुकतंच लग्न झालं. दोघे नेमके भेटले कुठे?
advertisement
1/8
पहिलीच भेट अन् 6 तास गप्पा, अपूर्वा-अंशुमनची 'अरेंज मॅरेज'वाली Love Story
शाळा फेम अभिनेता अंशुमन जोशी आणि आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे यांचं काही दिवसांआधीच लग्न झालं.
advertisement
2/8
दोघेही मनोरंजन क्षेत्रात, दोघेही कलाकार म्हणजे यांचं नक्कीच लव्ह मॅरेज असणार असं त्यांच्या चाहत्यांना वाटलं होतं. पण प्रत्यक्षात यांची स्टोरी काही वेगळीच आहे.
advertisement
3/8
अंशुमन आणि अपूर्वा यांचं लव्ह मॅरेज नाही तर अरेंज मॅरेज आहे. दोघांची अरेंज मॅरेजवाली लव्ह स्टोरी देखील खूपच फिल्मी आहे.
advertisement
4/8
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अंशुमन म्हणाला, "आमचं अरेंज मॅरेज आहे. अपूर्वाचा बर्थडे 25 मार्चला असतो आणि माझा 26 मार्चला. तिशीच्या आत माझं लग्न होणार असं माझ्या आईने सांगितलं होतं. त्यांनी माझ्याकडे लग्न करण्याचा हट्ट केला. घरच्यांनी मुली पाहायला सुरूवात केली."
advertisement
5/8
"घरी लग्नाचं सुरू असताना मी आणि अपूर्वा ऑनलाइन भेटलो. ऑनलाइन आमची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर आमच्यात चांगली मैत्री झाली. लग्न करून असं आमचं काही ठरलं नव्हतं. पण आमच्या दोघांचे आई-बाबा भेटले आणि त्यांनी आमच्या लग्नाच्या तारखा काढल्या आणि आमचं लग्न ठरलं."
advertisement
6/8
अपूर्वा म्हणाली, "मला या क्षेत्रातील मुलाशी लग्न करायचं नव्हतं. पण आमची ऑनलाइन ओळख झाली तेव्हा आम्ही एकाच इंडस्ट्रीत काम करतो या उद्देशाने मी त्याला भेटायला गेले होते. लग्नाचा कोणताही विचार माझ्या मनात नव्हता. पण हा जेव्हा मला सोडायला घरी आला तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. तिच आमच्यातली पहिली साइन होती."
advertisement
7/8
"आम्ही चॅट्सवर बोलणारे नाही आहोत. पण त्यानंतर आम्ही एकमेकांशी चॅटवर आठवडाभर बोलत होतो. काही महिने आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. आई बाबा म्हणाले तरच आपण लग्न करायचं असं आमचं ठरलं होतं."
advertisement
8/8
अपूर्वा पुढे म्हणाली, "आमचं एकदम चट मंगनी पट ब्याह असं झालं. पहिल्याच भेटील आम्ही 6 तास एकत्र होतो. आम्ही रात्रभर चॅटवर बोलत होतो. तेव्हाच एकमेकांविषयी मनात काही तरी आहे याचा अंदाज आला होता."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिलीच भेट अन् 6 तास गप्पा, अपूर्वा-अंशुमनची 'अरेंज मॅरेज'वाली Love Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल