TRENDING:

Marathwada Weather: मराठवाड्यात कडाक्याची थंडी! पारा 12 अंशांवर घसरला, कुठं किती तापमान?

Last Updated:
Weather update: मराठाड्यात थंडीचा जोर वाढत असून पारा 12 अंशांपर्यंत घसरला आहे. छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यात कडाक्याची थंडी! पारा 12 अंशांवर घसरला, कुठं किती तापमान?
राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे, उत्तरेकडून शीतलहरींचा प्रभाव कायम असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढत आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेला अक्षरशः धुके दाटले जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान 14 नोव्हेंबर रोजीचा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्यांत सामान्यतः निरभ्र आकाश राहील. हवेतील आर्द्रता कमी झाली असून. वातावरण अधिक कोरडे होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असू शकते.
advertisement
3/5
परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडे राहणार आहे. तसेच निरभ्र आकाश असणार असून तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज आहे. गेल्या दोन - तीन दिवसांपासून या विभागात रात्रीची थंडी वाढली असून 14 नोव्हेंबरलाही हीच परिस्थिती कायम राहणार आहे.
advertisement
4/5
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतही हवामान कोरडेच राहण्याची शक्यता असून दिवसभर हलकी उष्णता जाणवेल. मात्र, सूर्यास्तानंतर तापमान झपाट्याने घट होईल. येथे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहू शकते. सतत कमी होत असलेल्या तापमानामुळे या भागांतही थंडीचा कडाका आहे.
advertisement
5/5
उत्तरेकडून राज्यासह मराठवाड्यात शीत लहरींचा प्रवाह कायम असल्याने विविध भागांत थंडीचा कडाका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे तूर पिकाला धोका निर्माण होत आहे. शेतकऱ्यांनी देखील पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: मराठवाड्यात कडाक्याची थंडी! पारा 12 अंशांवर घसरला, कुठं किती तापमान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल