मराठवाड्यात पावसाची काय स्थिती? पिकांचं नुकसान झालंच, आता गुरांमध्ये पसरतोय आजार
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:APURVA PRADIP TALNIKAR
Last Updated:
Weather Forecast : मराठवाड्यात आधीच पावसामुळे पिकांचं फार नुकसान झालंय. त्यात आता छत्रपती संभाजीनगरसह सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर)
advertisement
1/5

नाथसागर धरण लवकरच 100 टक्के भरू शकतं, त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहावं.
advertisement
2/5
शेतकऱ्यांनी काढलेला माल सुरक्षित ठेवावा. मोसंबीच्या बागा असतील तर विशेष काळजी घ्यावी. तसंच आपलं आरोग्यही जपावं.
advertisement
3/5
अधूनमधून रिमझिम का होईना पण राज्याच्या सर्वच भागांमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे साथीचे आजार झपाट्यानं पसरताहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
advertisement
4/5
गुरांमध्येदेखील एक आजार झपाट्यानं वाढतोय, तो म्हणजे तीवा. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरांचीदेखील योग्य काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
5/5
हवामान विभागानं काही भागांना पावसाचा अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात पावसाची काय स्थिती? पिकांचं नुकसान झालंच, आता गुरांमध्ये पसरतोय आजार