Rain Alert: घरीच थांबा! मराठवाड्यावर पुन्हा आस्मानी संकट; संभाजीनगर, बीडसाठी 24 तास धोक्याचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरूच असून आज पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला आहे. पुढील 24 तासांसाठी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाचं थैमान सुरू आहे. पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची चिन्हे असून आज देखील हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर ठिकाणी वादळी पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/5
जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली या 5 जिल्ह्यांत देखील वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहून विजांचा कडकडाटात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पुढील 48 तासांपर्यंत हवामानाची हीच स्थिती कायम राहम्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा आणि इतर शेती पिकांना वादळी पावसाचा फटका बसला असून शेतकरी संकटात आहे. 391 जनावरे दगावली असून 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
advertisement
5/5
पुढील काही दिवस मराठवाड्याला वादळी पाऊस झोडपणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. विजा कोसळल्याने आतापर्यंत 27 जणांना जीव गमवावा लागला आहे. विजांचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी थांबणे गरजेचे आहे. तसेच वादळी पावसाच्या काळात घराबाहेर पडणे टाळावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Rain Alert: घरीच थांबा! मराठवाड्यावर पुन्हा आस्मानी संकट; संभाजीनगर, बीडसाठी 24 तास धोक्याचे!