TRENDING:

Rain Alert: विजा कडाडणार, ताशी 60 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना हायअलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसानं जोरदार हजेरी लावलीये. आज पुन्हा धाराशिव, लातूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
विजा कडाडणार, ताशी 60 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना हायअलर्ट
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील दोन दिवस म्हणजेच 24 मे पर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 मे रोजी लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/5
22 मे रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
23 आणि 24 मे रोजीही मराठवाड्यातील हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. या काळातही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता कायम राहील. हवामान खात्याने या काळातही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
5/5
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. हवामानातील बदलांचा विचार करूनच नागरिकांना घराबाहेर तसेच अत्यावश्यक कामे करावी. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीसंबंधी आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक इशाऱ्यांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Rain Alert: विजा कडाडणार, ताशी 60 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल